Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

दफनभूमी संदर्भात विश्वगुरु शंकराचार्य दशनाम गोसावी समाज चाळीसगाव तालुका यांच्या वतीने प्रांताधिकारी चाळीसगाव यांना निवेदन देण्यात आले

0
0 0
Read Time3 Minute, 22 Second

चाळीसगाव(प्रतिनिधी) आज दि २७/१२/२०१९ गुरुवार रोजी
श्री मुकेश प्रतापगिरी गोसावी यांच्या अध्यक्षेखाली विश्वगुरू शंकराचार्य दशनाम गोसावी समाज चाळीसगाव तालुका यांच्यावतीने सर्व समाज बांधवांनी सकाळी ११ वा.चाळीसगाव. प्रांतअधिकारी चाळीसगाव यांना दफनभुमी संदर्भात निवेदन दिले.
गोसावी समाजाने वेळोवेळी दफनभूमीसाठी जागेची मागणी केली असता असे लक्षात आले आहे की सदरची जागा ही शासनाने ग्रामपंचायतीला हस्तांतरित केलेली असल्याने गोसावी समाजाने व तहसील कार्यालयाने वेळोवेळी ग्रामपंचायतीकडे मागणी केली असता महाराष्ट्र शासन निर्णय ग्रामविकास विभाग क्रमांक/ द व भू /२०१० /प्र.क्र.६२ /परा ६ दिनांक १६/०९/२०१० तसेच उपसचिव ग्रामविकास विभाग यांचे सर्व जिल्हा अधिकारी व जीप मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेले पत्र जा.क्र.ददभु/२००४/परा ६(४७)/प्र.क्र.७७७/ग्रामविकास व जलसंधारण विभाग मंत्रालय मुंबई दिनांक १७/०४/२००४ नुसार प्रत्येक गावात दफनभूमी देणे हे शासनाचे कर्तव्य आहे.
तरी गोसावी समाजाने वेळोवेळी संपूर्ण कागदपत्रांची पूर्तता मोजणी.करून वेळोवेळी ग्रामपंचायतीकडे ठराव मागितला पण ग्रामपंचायतीने टाळाटाळ केली.त्यानुसार त्यांचे हरकत नाही असे गृहीत धरुन गोसावी समाज दफनभूमीसाठी ही जागा देण्यात यावी अन्यथा १५ जानेवारी पासून प्रांत कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात येईल असा इशारा दशनाम गोसावी समाज चाळीसगावच्या वतीने देण्यात आला. त्यावेळी सह्या करणारे समाजबांधव मुकेश गोसावी नितीन गोसावी, मंगल गोसावी ,गोरख सु गोसावी ,गणेशपेंटर गोसावी, गोरख अ गोसावी,संजय गोसावी ,संजय गोसावी ,पेंटर सुनील गोसावी ,किशोर गोसावी ,चंदन गोसावी, बजरंग गोसावी ,भैया गोसावी ,वाल्मिक गोसावी, मोतीगिरी गोसावी, शेखर गोसावी, रामचंद गोसावी ,प्रल्हाद भारती, नारायण भारती ,रवी गोसावी ,भिकन गोसावी,अप्पागिर गोसावी , मनोज गोसावी , रमेश भारती, संजय संतोष गोसावी ,अनिल गोसावी ,ज्ञानेश्वर गोसावी, प्रकाश गोसावी, त्रिशुल गोसावी, विश्वास गोसावी सर्व समाज बांधवांच्या सह्या असून निवेदन प्रसंगी उपस्थित होते.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: