दर्गा परिसरातील अवैध व्यवसाय थांबावावे भाविकांचे शहर पोलिसांना निवेदन

संपादक गफ्फार शेख(मलिक)
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
चाळीसगाव(प्रतिनिधी)-शहरातील हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेल्या हजरत पीर मुसा कादरी बाबा दर्गा परिसरात होत असलेले अवैध धंदे बंद करावे असे निवेदन दि 17 ऑगस्ट 2023 रोजी भविकांतर्फे शहर पोलीस स्टेशन ला देण्यात आले आहे.
बाबाचा दर्गा हा चाळीसगावात एकात्मतेचे प्रतीक असून नामांकित धार्मिकस्थळ आहे. दर्गा परिसरामध्ये काही लोकांनी अवैधरित्या झोपड्या बनवून तेथे काही स्त्रिया घाणेरडे काम व काही लोक गांजा , बटन गोळी, कुत्ता गोळी आदींची विक्री करत अवैध धंदे सुरू आहे आणि तेथे आलेल्या भाविक यांच्या सामानाची चोरी मोबाईल चोरी, मंगळसूत्र चोरी,बॅगांची चोरी असा त्रास नेहमी येथे येणाऱ्या भाविकांना होत असतो आणि चोरी करून तिथल्या तिथं झोपड्यांमध्ये असे चोर आसरा घेत असतात व अवैध व्यवसाय देखील चालतात तरी या सर्व प्रकारांमुळे दर्गा परिसराला बदनाम करण्याचे काम सुरू आहे.तरी तेथे पोलीस प्रशासनाने योग्य ती कारवाई करून त्या सर्व झोपड्या व परिसर अवैध धंदे मुक्त करून धार्मिक स्थळ स्वच्छ व सुंदर नशा मुक्त अभियान अंतर्गत परिसर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी सहकार्य करावे असे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी सलिम मुजावर,जूनैद मुजावर,सादिक मुजावर,पत्रकार तनवीर शेख,सलमान खान,नासिर मनियार,मुजम्मिल शेख,वसीम मास्टर,शाहिद मिर्झा आदी उपस्थित होते