अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी विजय जाधव

महाराष्ट्रात राज्यात सध्या सत्तेत असलेल्या महा विकास आघाडी सरकारच्या काळात संपूर्ण राज्यामध्ये विविध ठिकाणी दलित व बौद्ध समाजावरील अन्याय अत्याचाराचा आलेख सतत वाढत असून अलीकडील या सत्ताधीशांच्या कालावधीमध्ये या पुरोगामी संबोधनाऱ्या महाराष्ट्रात दिवसाढवळ्या तरुणांचे निर्घुण खून पाडण्यात आलेले आहेत.
सबब आम्हा दलित समाजामध्ये या राज्यात कायद्याचे राज्याचे राहिलेल्या आहे की काय? याबाबत सभ्रम निर्माण झालेला आहे हे दलित व बौद्ध समाजावरील वाढते अत्याचार रोखण्यात अकार्यक्षम महा विकास आघाडी सरकार अपयशी ठरलेलेे असून या दलीत समाजावरील अत्याचाराबाबत राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री चकार शब्दही बोलायला तयार नसून मूग गिळून गप्प बसले आहेत तसेच मागील दोन दिवसा अगोदर विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान राजगृह याठिकाणी काही माते फिरूंनी उधळपट्टी केली. तसेच बऱ्याच ठिकाणी शहरी भागात दलित युवकावर खोट्या केसेस व त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे सदरील घटना अत्यंत निंदनीय असून या घटनेचा आम्ही तमाम दलित व बौद्ध समाजाच्या वतीने जाहीर निषेध करीत आहोत या माथेफिरुनवर लवकरात लवकर कठोरात कठोर कारवाई व्हावी.
सबब रिपब्लिकन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय नेते मा. रामदासजी आठवले साहेब यांच्या आदेशान्वये आज दिं.11/07/2020 रोजी सकाळी लोकशाहीच्या सनदशीर मार्गाने दौंड पोलीस स्टेशन मध्ये निवेदन देण्यात आले निवेदना वरती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(A). सर्व पदाधिकाऱ्यांच्या सह्या केलेले आहेत निवेदन देताना रवी कांबळे उपजिल्हाध्यक्ष) विकास कदम (पं.स.सदस्य) प्रकाश भालेराव (आरपीआय नेते),सतीश थोरात (पं. महाराष्ट्र युवकाध्यक्ष), व तसेच दौंड शहरातील आरपीआय चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.