दहिटने येथील 22 नागरिकांचा अहवाल आला आहे
दौंड(प्रतिनिधी) दौंड तालुक्यातील दहीटणे येथे ( दि २९ ) एप्रिल रोजी या गावात पहिला कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळुन आला होता. दहीटणे गावाच्या परिसरातील आठ किलोमीटर चा परिसर सील केला होता. या नागरिकाच्या संपर्कात आलेल्या नागरिकांची आरोग्य तपासणी प्रशासनाच्या वतीने घेण्यात आली होती. या नागरिकांना आवश्यक ती खबरदारी घ्यावी आशा सूचना देण्यात आल्या होत्या. संपर्कात आलेल्या नागरिकांचे अहवाल पुणे येथे तपासणी करण्यासाठी पाठवले होते. अखेर आज (दि २) या २२ नागरिकांचे आहवल निगेटिव्ह आले असून एका व्यक्तीचा अहवाल प्राप्त झाला नाही. माहिती दौंड तालुका आरोग्य अधिकारी डॉ अशोक राजगे यांनी सांगितले. या मुळे तालुक्यातील नागरिकांना दिलासा मिळालेला असून. नागरिकांनी विनाकारण घरा बाहेर पडू नये. आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी घ्यावी. स्थानिक पातळीवर प्रशासन योग्य त्या उपाय योजना करत आहेत. नागरिकांनी कोणत्याही आफवेला बळी पडू नयेत. असे आवाहन प्रशासना कडून करण्यात येत आहे.
दौंड प्रतिनिधी
कु:पवन साळवे