अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी गफ्फार शहा
चाळीसगांव(दि 22)-चाळीसगाव तरुण वयात दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या तरुणावर पोलिसांची दबंग कारवाई रात्री शहर पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत दारू पिऊन धिंगाणा घालनाऱ्या माजी नगरसेवकाच्या मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे ,चाळीसगाव शहरातील स्टेशन रोड परिसरात असलेल्या साई पान स्टॉल शेजारील सार्वजनिक जागेवर दारू पिऊन धिंगाणा करणारा तरुण नामे अथर्व येमेश नेरकर (सोनार) वय- 22 वर्षे , धंदा- ज्वेलरी डीजायनिंग , राहणार- सराफ गल्ली, चाळीसगाव यांचेवर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम व महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला मध्यरात्री गुन्हा दाखल करण्यात आला असून, गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि मयूर भामरे हे करीत आहेत।
सदर धिंगाणा घालणाऱ्या तरुणाचे वडील चाळीसगाव शहरातील माजी नगरसेवक असल्याची माहिती समोर येत आहे व त्यामुळेच आपले कोणी वाकडे करू शकत नाही या अविर्भावात सदर तरुण वावरत होता अशी चर्चा आहे.
रात्रीच्या वेळेस शहरात मद्यपान करून सर्वसामान्य नागरिकाना त्रास देणाऱ्या अशा बड्या धेंडांवर कारवाई झाल्याने परिसरातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे.