(अधिकार आमचा न्यूज नेटवर्क)
दौंड प्रतिनिधी-पवन साळवे
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पूर्ण देशात लॉकडाऊन घोषित केला व सर्व देशातील उद्योग व्यवसाय ठप्प झाले व प्रत्येक राज्यातील मोठमोठ्या कंपनीला या लॉकडाऊनचा सामना करावा लागत आहे व सर्व क्षेत्रातील मजुरांवर उपासमारीची वेळ आली आणि या उपासमारीचा सामना किती दिवस करणार या उद्देशाने सर्व मजूर आपापल्या गावी जाण्यासाठी आतुर झाले आहेत व ज्या वाहनांनी गावी पोहचता येईल त्या वाहनांनी गावी जाण्याचा प्रयत्न करत आहेत व काही मजूर आपल्या गावी जाण्यासाठी पायी चालत निघाले आहेत आणि यात जास्त प्रमाणात परप्रांतीय नागरिक दिसून येत आहेत महाराष्ट्र मध्ये पोट भरण्यासाठी आलेल्या मजुरांना आता या कोरोनाच्या महामरीने गावी जाण्यास भाग पाडले आहेत.त्याच अनुषंगाने काल दिनांक-१७/०५/२०२० रोजी काही परप्रांतीय अकलूजवरून टेम्पो मध्ये बसून गावी जाण्यासाठी निघाले असता टेम्पो चालकाने त्या सर्व ३३ मजुरांना दौंड शहरात सोडून निघून गेला व त्या सर्व मजुरांची हाल होण्यास सुरुवात झाली त्यांच्या जेवणाची व्यवस्था ही करण्यात आली.सर्व मजुरांनी महाराष्ट्र सरकारचे आभार मानले व गावी जाऊन शेती करून तिकडे पोट भरून परिवारासोबत वेळ घालवू असेही ते म्हणाले.त्याच सर्व परिस्थिती चा आढावा घेऊन दौंडमधील कर्तव्यशील व पोलीस कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा माणुसकी चे दर्शन घडवून आणले.डी.वाय.एस.पी ऐश्वर्या शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली व दौंड पोलिस निरीक्षक सुनिल महाडिक यांच्या नेतृत्वात व महिला पो उपनिरीक्षक अमृता काटे यांच्या उपस्थितीत व पो.कॉ.वाकळे,पो.कॉ.गोलांडे, यांच्या सहकार्याने सर्व मध्य प्रदेश येथे एसटी रवाना केली.