अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
दौंड शहर प्रतिनिधी-कु:पवन गौतम साळवे
दिनांक:१८/०६/२०२० रोजी दौंड उपविभागीय अधिकारी श्रीमती ऐश्वर्या शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय कार्यालयातील पोलीस उपनिरीक्षक श्री:नितीन मोहिते,गणेश कडाळे,पो.कॉ.रवी काळे,पो.कॉ.महेश पवार.यांनी सदर ठिकाणी जाऊन अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यावर कारवाई केली.बेटवाडी रोडवर रात्री ९:३० सुमारास विनापरवाना अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रक नंबर-एम एच-४२/ए.क्यू ७९३२ व एम.एच-१६/ए.ई.५५११ अडवली वरील ट्रकचा अज्ञात चालक पळून गेला दुसरा ट्रक चालक चालक सुरेश मोतीराम राठोड रा. सोनवडी तालुका-दौंड जिल्हा पुणे याला ताब्यात घेण्यात आले आहे दोन ट्रक सह सहा ब्रास वाळू एकूण१२३०००० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून भा.द.वी. कलम ३७९,१८८,२६९,२७०,३४ तसेच साथीचे रोग अधिनियम १८९७ चे कलम.२.३.४ कोव्हीड-१९ उपाययोजना कलम ११,राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ कलम ५१(ब)नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पो. कॉ गणेश कडाळे यांनी फिर्याद दिली व पुढील तपास पोलीस हवालदार कल्याण शिंगाडे हे करीत आहेत.
