अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी विजय जाधव

राजगृहावर काही समाज कंटकांनी केलेल्या तोडाफोडी बाबत संविधान पध्दतिने निवेदन तहसिलदार व दौड पोलीस स्टेशनला रिपब्लिकन सेने कडून देण्यात आले.
दिं.०७/०७/२०२०रोजी. मुंबई येथे संविधान निर्माते महामानव परमपूज्य डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजगृहावर काही असामाजिक तत्वाच्या समाजकंटक लोकांनी नाहक तोडफोड करून विद्रूप करण्याचे कटकारस्थान केले ही अत्यंत दुदैवी घटना आहे.

ज्या लोकांनी हे अशोभनीय कृत्य केले ते कोण आहेत आणि कोणाच्या सांगण्यावरून केले याचा शोध प्रशासनाने त्वरित करावा व त्यांना कठोर शिक्षा व्हावी या दिशेने तपास करावा शिवाय संबंधित राजगृहाला कायमस्वरूपी पोलीस सुरक्षा प्रदान करण्यात यावी घडलेल्या दुर्देवी घटनेचा आम्ही आमच्या रिपब्लिकन सेना तालुका दौंड जिल्हा पुणे यांच्यावतीने जाहीर निषेध करीत आहोत. असे निवेदन दि ०८/०७/२०२० रोजी देण्यात आले निवेदनावर अनिल साळवे ( पश्चिम महाराष्ट्र कामगार नेता रिपब्लिकन सेना) आनंद बगाडे (पुणे जिल्हा उपाध्यक्ष) मोहन सोनवणे (दौंड तालुका अध्यक्ष) दीपक सोनवणे (शहराध्यक्ष राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभाग) राजू (कृष्णा) गायकवाड (कामगार रिपब्लिकन कामगार सेना प्रमुख दौंड तालुका) यांच्या सह्या आहेत हे निवेदन दौंड पोलीस स्टेशन व तहसील कार्यालय दौंड यांना देण्यात आले.