दौंड तालुका ॲडव्होकेट बार असोसिएशन तर्फे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा……

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
महिला प्रतिनिधी योगिता रसाळ
दौंड(प्रतिनिधी)-८मार्च २०२३ रोजी, दौंड तालुका ॲडव्होकेट बार असोसिएशन तर्फे,जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शासकीय महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मानचिन्ह देऊन विशेष सत्कार करण्यात आला.
८ मार्च हा जागतिक महिला दिन संपूर्ण जगामध्ये साजरा केला जातो. महिला हया कुटुंब समाज व देशसाठी महत्त्वाचा घटक असून स्त्री सुशिक्षित व सुरक्षित असेल तरच समाज प्रगती करू शकतो. एक स्त्री शिकली तर संपूर्ण कुटुंब सुशिक्षित होवून प्रयायाने देशाचा विकास होण्यास सर्वात मोठा महिलांचा वाटा आहे.यावेळी दौंडच्या प्रथम न्यायदंडाधिकारी सरन्यायाधीश गोयल मॅडम व पोलीस अधीक्षक तथा प्राचार्य, नानविज ट्रेनिंग सेंटर दौंड चे श्रीमती कल्पना बारवकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
सदर कार्यक्रमास राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक पाचचे समादेशक व पोलीस अधीक्षक आयपीएस श्रीमती वनिता साहू, श्रीमती कल्पना बारवकर पोलीस अधीक्षक तथा प्राचार्य नानविज ट्रेनिंग सेंटर दौंड, दौंड न्यायालयातील महिला न्यायाधीश कुलकर्णी, मुक्कनवर, गोयल व दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सुनिता चवरे तसेच मळद गावच्या विद्यमान सरपंच व नवनिर्वाचित प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी श्रीमती मोहिनी बापूराव भागवत या सर्वांचा विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी मोठ्या प्रमाणात पुरुष व महिला वकील वर्ग सहकुटुंब इतर सर्व मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.