अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी विजय जाधव
दौंड शहरा मध्ये कोरोना संक्रमित रूग्ण आढळून येत असल्याने मा. उपविभागीय अधिकारी तथ Incident Commander दौंड पुरंदर यांनी संपुर्ण दौंड शहर प्रतिबंधीत क्षेत्र घोषित केले आहे. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना अंतर्गत नगरपरिषदेमार्फत दौंड शहरा मध्ये अत्यावश्यक सेवेमध्ये ठरवुन दिलेल्या वेळेत दुकाने बंद न केलेल्या एकूण १३ दुकानावर दिं.१०/०७/२०२०.रोजी कारवाई करून रू.६ हजार ५००इतका दंड वसुल करण्यात आला. या पुर्वि शहरातील आदेशाचे पालन न करणाऱ्या २३० नागरीकांनवर दंडात्मक करण्यात आली. दौंड शहरामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणुन प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यात येत आहे. जे नागरीक मा. शासनाचे आदेशानुसार सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणणरे नागरीक, अत्यावश्यक सेवेमध्ये चालू असलेली दुकानातील दुकानदार मास्क परीधान न केलेल्या ग्राहकांना प्रवेश देणे, व्यवसायाच्या ठीकाणी सोशल डिस्टसींगचे पालन न करणे, सार्वजनीक ठीकाणी थुंकणे अशा नागरीकांनवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे यांची नागरीकांनी सक्त नोंद घ्यावी. सदर बाब नागरीकांनी लक्षात घेऊन दौंड शहरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी करणेस संपुर्ण दौंड शहरवासीयांनी दौंड नगर परिषदेस सहकार्य करावे व शासनाच्या आदेशाचे काटेकोर पणे पालन करावे. असे दौंड नगरपरिषदेचे मुख्यधिकारी श्री.मंगेश शिंदे यांनी सांगीतले. या कारवाई मध्ये विक्रम जाधव, राजू वाडीया, हर्षल घुले, भोसले,शिवदत्त,काळे,वरणदिवे यांनी सहभाग घेतला होता.