Read Time1 Minute, 20 Second
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
विजय जाधव दौंड

दौंड शहरा मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून आर्सेनिक अल्बम या होमियोपॅथीक औषधाचे वाटप ॲड.अरूणा डहाळे नगरसेविका यांच्या कडून दौंड शहरातील पानसरे वस्ती येथील अनाथ मुलांसाठी काम करत असलेल्या सडक या संस्थेत व गजानान सोसायटी परिसरात करोना चां प्रादुर्भाव रोखण्यासाठी आर्सेनिक अल्बम या होमियोपॅथी औषधाचे वाटप करण्यात आले, प्रभागाच्या नगरसेविका .ॲड.अरुणा डहाळे ,श्री.दिलीप डहाळे व डॉ.रणजित थोरात यांच्या वतीने वाटप करण्यात आले.एकूण ५००बॉटल वाटण्यात आल्या त्याचा लाभ २०००लोकांना घेता येईल.आता पर्यंत १५०० बॉटल चे वाटप करण्यात आले असून त्याचा लाभ ५००० लोकांना घेता आला असल्याची माहिती ॲड डहाळे व डॉ.थोरात यांनी दिली.अजूनही वाटप करण्याचा संकल्प असल्याचे सांगण्यात आले.