अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
दौंड शहर प्रतिनिधी पवन साळवे
गेले काही दिवसांत दौंड नगरपरिषदेच्या हद्दीमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झालेले रुग्ण आढळत आहेत दुर्दैवाने त्यातील काही रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला या पार्श्वभूमीवर दौंड येथे आमदार राहुल कुल यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेतली. दौंड नगरपालिका, सार्वजनिक आरोग्य विभाग, पोलीस विभागाद्वारे करण्यात येणाऱ्या विविध उपाय योजनांचा आढावा घेतला तसेच वाढत्या प्रादुर्भावाच्या धर्तीवर आवश्यक असणाऱ्या कोविड टेस्ट किट, सार्वजनिक आरोग्य केंद्रातील PPE किट, N ९५ मास्क ची योग्य प्रमाणात उपलब्धता, कोविड सेंटर, संस्थात्मक विलगीकरण येथील सुविधांवर विशेष लक्ष देण्याच्या निर्देश दिले.
आपल्या माध्यमातून शहरातील झोपडपट्टी व प्रतिबंधक क्षेत्रात असणाऱ्या प्रत्येक घरांमध्ये सॅनीटायझर चे वाटप करण्याचे नियोजन करण्यात आले असून, दौंड शहरातील कोविड सेंटर अपुरे पडल्यास पर्यायी व्यवस्था म्हणून यवत ट्रॉमा केअर सेंटर मध्ये उपचाराची व्यवस्था करण्यात येणार आहे, काही प्रमाणात रेल्वे सेवा सुरु झाल्यानंतर रेल्वे स्थानकात सध्या आठ गाडयांना थांबा आहे या गाड्यांमधून रात्री व पहाटे उतरणाऱ्या प्रवाशांची तपासणी करणे व योग्य काळजी घेणे , नगरपालिके द्वारे प्रत्येक घरात मास्क वितरण करावे आदी तसेच शहारात विना मास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याची सूचना केली.
दौंड शहरात आढळलेल्या बहुतांशी रुग्णांना तालुक्याबाहेरील व्यक्तींच्या संपर्कात आल्याने त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निदर्शनास येत आहे. या आधी दौंड शहरातील प्रतिबंधात्मक क्षेत्रात बदल करून ते रुग्ण अढळलेल्या क्षेत्रांपुरते मर्यादित ठेऊन इतर भागामध्ये शिथिलता देण्याची कार्यवाही करण्यात आली होती परंतु प्रशासनाद्वारे वारंवार आवाहन करून देखील शहरात अनेक ठिकाणी सोशल डिस्टंसिंगचे, कंटेनमेंट झोनच्या नियमांचे पालन होत नसल्याचे आढळून येत आहे. सर्व सामान्यांचे जनजीवन पूर्वपदावर यावे यासाठीचा हा निर्णय शासनाने घेतला आहे तेव्हा नागरिकांनी अनावश्यक गर्दी टाळणे व सोशल डिस्टंसीग चे कटाक्षाने पालन न केल्यास पुन्हा शहरात कडक संचारबंदी लागू करावी लागू शकते याची सर्वांनी दखल घ्यावी व सहकार्य करावे हि नम्र विनंती.
आज पार पडलेल्या या बैठकीस तहसीलदार मा. संजय पाटील, मुख्याधिकारी मा.मंगेश शिंदे, गटविकास अधिकारी मा.गणेश मोरे, नगराध्यक्षा मा.सौ शितलताई कटारिया, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. संग्राम डांगे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अशोक राजगे ,दौंड नगरपालिकेचे नगरसेवक उपस्थित होते.