पुणे (दौंड)कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकडाऊन असताना दौंड मध्ये विनाकारण मोकाट फिरणाऱ्या 20 दुचाकी स्वरांना दौंड पोलीस स्टेशनकडून कलम144 व 188 नुसार कारवाही करणयात आली असून कारवाई केलेल्या दुचाकी दौंड पोलीस स्टेशनमध्ये जप्त करण्यात आल्या असून.दौंड पोलिस निरीक्षक सुनिल महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार शिंगाडे,पोलिस हवालदार असिफ शेख, पांडुरंग थोरात, पोलीस हवालदार बापू रोटे,पोलिस कॉन्स्टेबल किरण राऊत,पोलिस कॉन्स्टेबल अमजद शेख,रवि काळे, महिला- पोलिस नाईक खेत्रे, महिला पोलीस भवार, महिला पोलिस कॉन्स्टेबल खरात,कलम 144व 188 नुसार कारवाई करण्यात आली 20 दुचाकी वर कारवाई करण्यात आली. पोलिस निरीक्षक सुनील महाडिक यांनी यावर दौंड मधील जनतेला असे अहवाहन केले आहे की,या पुढे जर कोणी शासनाने दिलेल्या नियमांचे उल्लंघन करत असेल तर त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे असेही त्यांनी सांगितले. व अश्या मोकाट फिरणाऱ्या तळीरामांवर अजूनही कारवाई 144 व 188 नुसार कारवाही सुरू असून ,म्हणून आपण घरीच रहा ,सुरक्षित रहा विनाकारण रस्त्यावर फिरू नका.
