दौंड(प्रतिनिधी):-दौंड रेल्वे स्टेशनचे व्यवस्थापक श्री सॕम्युएल क्लिफ्टन आणि NRMU दौंडच्या माध्यमातून आणि पानसरे हॉस्पिटलचे सर्वेसर्वा डॉ श्री सुभाष पानसरे आणि डॉ सौ ज्योती सुभाष पानसरे यांच्या सौजन्याने आज दि. 16/3/2020 रोजी सकाळी 11:30 वाजता दौंड स्टेशनवर कोरोना व्हायरस या विषयावर रेल्वे कर्मचारी व प्रवाशांना मार्गदर्शन करण्यात आले. डॉ सुभाष पानसरे यांनी कोरोनाविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
कोरोना व्हायरसच्या तीन स्टेज तसेच या व्हायरसबद्दल असणारे गैरसमज याविषयी माहिती दिली आणि प्रतीकारशक्ती वाढवली तर या आजाराचा मुकाबला करणे शक्य आहे व हा आजार होऊ नये यासाठी कशाप्रकारे खबरदारी घेता येईल याचे विस्तृत मार्गदर्शन केले. यानंतर डॉ सौ ज्योती पानसरे यांच्या हस्ते महिला कर्मचाऱ्यांना व तसेच त्यांचे स्टाफ यांचे हस्ते उपस्थित कर्मचाऱ्यांना मास्क वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन NRMU चे सचिव श्री संदीप शेलार यांनी केले. समस्त कर्मचाऱ्यांच्या वतीने डॉ सुभाष पानसरे व डॉ सौ ज्योती पानसरे यांचा सत्कार करण्यात आला तसेच आभार मानण्यात आले.