(१) सोमवार/गुरुवार
वेळ-सकाळी-८:०० ते सायं-४ पर्यंत
आटोमोबाईल(सर्व्हिसेस सेंटर)कॉम्प्युटर/इलेक्ट्रॉनिक दुकाने ,बॅटरी,रेडिमेड फर्निचर, मोबाईल शॉपी,फोटो स्टुडिओ,स्वीट होम्स,खेळणी दुकान, फुले व पुष्पहार दुकाने,कापड व रेडीमेड दुकाने.
(२) मंगळवार/शुक्रवार
वेळ-सकाळी-८:००ते सायं-४ पर्यंत.
भांडी दुकान,टेलरिंग,फुटवेअर दुकाने,टायर्स विक्री व पंक्चरची दुकान,घड्याळ दुकाने,सुटकेस/बॅगची दुकान,वोशिंग सेंटर,झेरॉक्स, डिजिटल फ्लेक्स प्रिंटिंग, मातीची भांडी दुकान,टोपल्या बांबू.
(३) बुधवार/शनिवार
वेळ-सकाळी-८:०० ते सायं-४ पर्यंत
जनरल स्टोअर्स,कटलरी,ज्वेलरी व सोना चांदी दुकान(सराफ दुकान),सायकल विक्री दुकान,बांधकाम स्टील विक्री,हार्डवेअर व बिल्डिंग मटेरियल दुकान,साडी व शूटिंग शरटिंग. इ दुकाने.
दररोज चालू असणारी अत्यावश्यक दुकाने (रविवार वगळून)
जीवनावश्यक सेवांतर्गत किराणामाल दुकाने,भाजीपाला,फळे,दूध,शेतीविषयक बी-बियाणे औषधे.
अटी व शर्ती
१)ग्राहकांनी मास्क तोंडावरती बांधलेला असेल तर त्यांना खरेदीसाठी प्रवेश द्यावा.
२)दुकानांमध्ये एकावेळी फक्त ५ ग्राहक खरेदीसाठी सोडण्यात यावे.
३)दुकानाच्या प्रवेशद्वारावर ग्राहकांचे थर्मल स्कॅनिंगची सुविधा करण्यात यावी.
४)दुकानात प्रवेशाच्या वेळी सर्व ग्राहकांना handwash किंवा हँड सॅनिटायजरची सुविधा करण्यात यावी.
५)होम क्वारंटाईन केलेल्या नागरिकांना दुकानात प्रवेश देण्यात येऊ नये.
६)शक्यतो वय वर्ष ५ ते ६० वर्षांवरील व्यक्तींना प्रवेश देण्याचे टाळावे.
७)कामगारांच्या एकूण क्षमतेच्या ३३% कामगारांचा वापर करावा.
८)दुकान मालक व कामगार यांनी मास्क व फेस शिल्ड वापरणे बंधनकारक राहील.
९)सर्व आस्थापना यांनी त्यांची दुकानात एक रजिस्टर ठेवायचे असून त्यामध्ये येणाऱ्या ग्राहकांची संपूर्ण माहिती व मोबाईल नंबर नमूद करावे बंधनकारक राहील.
१०)दुकानात व दुकानाबाहेर सामाजिक अंतर ठेवण्यात यावे.
११)अत्यावश्यक सेवा व शेती विषयकबाबी दररोज सुरू राहील.
१२)आस्थापना चालक/मालक/कर्मचारी/कामगार यांनी आरोग्य सेतू एप वापरणे बंधनकारक राहील.
१३)ज्या अस्थापणामध्ये एकापेक्षा जास्त व्यवसाय चालविले जातात आस्थापनाही दोन दिवसांपेक्षा जादा दिवस सुरू ठेवता येणार नाहीत. वरील दिलेल्या शर्तीचे पालन करणे बंधनकारक राहील व तपासणी करण्यासाठी पथकांची नेमणूक करण्यात यावी. मा:प्रमोद गायकवाड उपविभागीय दंडाधिकारी दौंड पुरंदर यांच्या वतिने आदेश देण्यात आले आहे.