दौंड(पवन साळवे)कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना राबवण्यात केंद्र सरकार व राज्य सरकार वेळ खर्ची घालत आहे व देशात व राज्यात कोरोना चा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे.पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ९००अधिक झाली असल्याने त्याच अनुषंगाने दौंड शहरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव प्रभावीपणे रोखण्यासाठी व त्याची अंमलबजावणी करण्यासाठी दि-२८/०४/२०२० ते दि-३०/०४/२०२० रोजी अर्थात या तीन दिवसांचा कालावधीत दौंड शहरात संपूर्ण लॉकडाऊन करण्यात येणार आहे. या कालावधीत सर्व वैद्यकीय सेवा व मेडिकल दुकाने सुरू राहतील.तसेच दुध वितरण सकाळी ७:०० ते ९:००या कालावधीत सुरू राहतील व इतर सर्व दुकाने भाजीपाला,फळांचे स्टोल, किराणा,व मांसाहारी दुकाने पूर्णपणे बंद राहतील आणि जो कोणी शासनाच्या नियमांचे उल्लंघन करेल त्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे दौंड पोलिस निरीक्षक सुनील महाडिक बजावून सांगितले व पूर्ण बंदला जनतेने सहकार्य करावे व कोरोनाला हद्दपार करण्यास घरात बसून लढा द्यावा असे अहवाहन तहसीलदार संजय पाटील, मुख्यधिकारी मंगेश शिंदे,नगराध्यक्षा शितल कटारिया, गट नेते बादशहा भाई शेख,गट नेते राजेश गायकवाड यांनी केले.घरात रहा सुरक्षित रहा
Read Time2 Minute, 3 Second