नगरसेवक परिषद, मुंबई,महाराष्ट्र या राज्य पातळीवर काम करणाऱ्या संस्थेच्या पुणे जिल्हा महिला अध्यक्ष पदी दौंड नगरपालीकेच्या विद्यमान नगरसेविका ऍड .सौ.अरूणाताई डहाळे यांची निवड

4 0
Read Time2 Minute, 12 Second

दौंड(प्रतिनिधी)दि 5- नगरसेवक परिषद, मुंबई,महाराष्ट्र या राज्य पातळीवर काम करणाऱ्या संस्थेच्या पुणे जिल्हा महिला अध्यक्ष पदी दौंड नगरपालीकेच्या विद्यमान नगरसेविका ऍड .सौ.अरूणाताई डहाळे यांची निवड झाली आहे.
या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.राम जगदाळे पाटील व राज्य सरचिटणीस मा.कैलास गोरे पाटिल यांनी निवडीचे प्रमाणपत्र देवुन त्यांचे संघटनेत स्वागत केले. सदरची संस्था राज्य पातळीवरील सर्व नगरपालिका, नगरपंचायती,महानगरपालिका यातील सर्व पक्षीय नगरसेवक, नगरसेविका यांचे संघटन करून विविध मागण्या राज्य सरकार कडे करीत आहे. राज्य पातळीवर संघटना मजबूत झाल्यास अनेक नगर विकासाच्या दृष्टीने निधी उपलब्ध करून घेऊन जनतेला दिलासा देता येईल. तसेच नगरसेवकांचे मानधन वाढवणे, नगरसेवकांना समान नीधी मिळावा,नगरसेवकांना मंत्रालय प्रवेश त्यांच्या ओळखपत्रावरच देण्यात यावा,पेन्शन देण्यात यावी अशा विविध मागण्या शासनदरबारी मांडुन पाठपुरावा करणार आहेत. दौंड नगरपालीकेच्या धडाडीच्या, कार्यक्षम व निष्ठावंत नगरसेविका अॅड.सौ.अरूणा ताई डहाळे यांची पुणे जिल्हा महिला अध्यक्ष पदी निवड झाल्यामुळे शहरातील प्रलंबित विकास योजना व इतर अनेक नगरपालीकेच्या संदर्भातील कामांना बळ मिळणार आहे. त्यांच्या निवडी बद्दल संघटनेचे धन्यवाद!व अॅड.अरुणा डहाळे यांचे निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन आणि शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.