नामांकित कन्स्ट्रक्शन कंपनी चे नाव उत्कृष्ट मात्र काम नित्कृष्ठ,नित्कृष्ठ भुयारी गटारीच्या ढाप्यामुळे होत आहेत अपघात….

संपादक गफ्फार शेख(मलिक)
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
चाळीसगाव(प्रतिनिधी)-अँग्लो उर्दू हायस्कुल बाजूच्या गेट समोरील शहरातील नागद रोडवरील भुयारी गटारी चे काम सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत चाळीसगाव शहरातील नामांकित कन्स्ट्रक्शन कंपनीने केले असून कंपनीचे नाव उत्कृष्ट दर्जाचे असले तरी गटारींवर टाकण्यात आलेल्या ढाप्यांचे काम नित्कृष्ठ दर्जाचे झाले आहे.
शहरातील नामांकित असलेल्या पुंशी कन्स्ट्रक्शन कंपनी ने या भुयारी गटारीचे काम केले असल्याचे कळते मात्र काही ठिकाणी साफ सफाई साठी भुयारी गटारीवर ढापे टाकण्यात आले न होते असे ठेकेदाराचे म्हणने होते.मात्र तेथे वारंवार होणारे छोटे मोठे अपघात हे परिसरातील नागरिकांची डोकेदुखी ठरत होते या मुळे परिसरातील नागरिकांनी भविष्यात यामुळे पुन्हा अपघात होऊन जीवितहानी टाळण्याच्या दृष्टीने त्यावेळी सदर ठेकेदारास कळवीत भुयारी गटारी वर ढापे टाकण्याची मागणी करण्यात आली होती ढापे टाकण्यात आले. मात्र काही दिवसांपूर्वी टाकलेल्या या नित्कृष्ठ दर्जाच्या ढाप्यावरून आज दि 3 सप्टेंबर रोजी मालवाहतूक जीप जात असतांना ढापा तुटून गाडीचे चाक आत गेल्याने अपघात झाला यामुळे गाडीचे नुकसान झाले असून चालकास देखील दुखापत झाली आहे.सुदैवाने जीवित हानी झाली नाही मात्र ठेकेदार जीवित हानी होण्याची वाट पाहत आहेत का? असा सवाल यामुळे उपस्थित होतो अपघात न होण्यासाठी भुयारी गटारीवर ढापे टाकले आता त्याच नित्कृष्ठ दर्जाच्या ढाप्यांमुळे अपघात होत आहे.
शासकीय ध्येय धोरणानुसार या कामाची दोषदायित्व कालावधी अंदाजे 10 वर्ष तरी संबंधित ठेकेदाराकडे असतांना याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे.सदर कामाच्या दर्जाची वरिष्ठांनी चौकशी करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.तसेच लवकरात लवकर सदर कामाची उत्कृष्ट दर्जाचे काम करत दुरुस्ती करावी जेणे करून पुन्हा यामुळे अपघात होणार नाही.