अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी गफ्फार शाह
चाळीसगाव(प्रतिनिधी):-पेट्रोल,डिझेल व घरगुती गॅस च्या किंमतींनी भडका घेतला असून काही जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत भरमसाठ वाढच्या निषेधार्थ चाळीसगाव ऑल इंडीया मजलिस ए इत्तेहादूल मुस्लिमीन(एम आय एम) यांचे आज दिनांक 18 जून शुक्रवार रोजी तहसीलदारांना निवेदन
पेट्रोल,डिझेल व घरगुती गॅस च्या किंमतींनी भडका घेतला असून काही जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत भरमसाठ वाढ झाल्यामुळे जनसामान्यांना याची झळ सोसावी लागत असून कोरोनाच्या काळात हाताला काम नव्हते व जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमती यामुळे लोकांचे जीवन विस्कळीत झाले असून पुन्हा जण जीवन सुरळीत होण्यासाठी केंद्र सरकारने पेट्रोल,डिझेल च्या किमतीत घट करावी जेणे करून जीवनावश्यक वस्तूंवर वाढणार ट्रान्सपोर्ट चा बोजा कमी होईल व केंद्र सरकारने जीवनावश्यक वस्तूंवर विविध कर कमी करत जनतेला दिलासा द्यावा असे चाळीसगाव ऑल इंडीया मजलिस ए इत्तेहादूल मुस्लिमीन(एम आय एम) चे शहर अध्यक्ष मुख्तार कुरेशी यांनी सांगितले व पेट्रोल और डीजल चे दर 25% ने कमी करण्यात यावे या साठी चाळीसगाव एम आय एम तर्फे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले यावेळी एम आय एम शहर अध्यक्ष मुख्तार खान,युवा अध्यक्ष अमजत शेख,सचिव वसिम शेख,जन सम्पर्क अध्यक्ष कलिम शेख,हाजी फिरोज, सय्यद शकील,लतीफ़ बिल्डर, मोईन खान ज़ाकिर अली ,अरबाज पठान,फरीद खान व कार्यकर्ते उपस्थित होते