परदेशातून परतलेल्या व्यक्तींना विलगीकरण कक्षात राहणे अनिवार्य करा – महापौर

Read Time1 Minute, 12 Second

पुणे(प्रतिनिधी)-१९ मार्च २०२० पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १९ वर पोहोचली आहे. त्यातील बहुतांश रुग्णांना ते परदेशातून देशात आल्याची पार्श्वभूमी आहे. आपण परदेशातून परतणार्‍या नागरिकांना त्यांच्याच घरात विलगीकरण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. परंतु, मुंबई आणि पुणे विमानतळावर येणारे आणि महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात जाणारे हे नागरिक स्थानिकांच्या संपर्कात येत आहेत.

पुण्यातील घटनांमध्ये हे प्रकर्षाने जाणवले असून, त्यामुळे शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे घरी विलगीकरण करण्याऐवजी विलगीकरण कक्षात राहणे अनिवार्य करावे, अशी मागणी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.

Previous post मा मंगेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली दौंड शहरातील अनधिकृत टपऱ्या, हातगाडे,स्टॉल व अनधिकृत बांधकामे यांच्यावर कारवाही करण्यात आली
Next post कोरोना विषाणूच्या संसर्ग रोखण्यासाठी पुणे जिल्ह्यतील सर्वं पान टपरी बंद ठेवण्याचे आदेश
error: Content is protected !!
%d bloggers like this: