अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी सनी घावरी
अधिकार आमचा न्यूज – मावळातील पवना धरण पाणलोट
क्षेत्रात चांगला पाऊस पडत असल्याने धरणातील
पाणीसाठ्यात वेगाने वाढ होत आहे. गेल्या 24 तासांत
धरण क्षेत्रात 108 मिली मीटर पावसाची नोंद झाली
आहे. यामुळे धरणातील पाणीसाठ्यात 4.73 टक्क्यांनी
वाढ झाली असून एकूण साठा 72.53 टक्के झाला
आहे.
पिंपरी-चिंचवडसह मावळवासीयांची तहान पवना
धरणातून भागविली जाते. ऑगस्टच्या सुरुवातीपासून
पावसाला सुरुवात झाली आहे. धरण पाणलोट क्षेत्रात
चांगला पाऊस पडत आहे. त्यामुळे साठ्यात वाढ होऊ
लागली आहे. त्यामुळे समाधान व्यक्त केले जात आहे.
गेल्या 24 तासांत धरण क्षेत्रात 108 मिली मीटर पावसाची
नोंद झाली आहे. 4.73 टक्क्यांनी वाढ झाली असून 1
जूनपासून 1193 मिली मीटर पाऊस धरण क्षेत्रात झाला
आहे. पाणीसाठ्यात 37.23 टक्के वाढ झाली आहे.
दरम्यान, गेल्या वर्षी आजच्या तारखेचा धरणातील
पाणीसाठा 98.62 टक्के होता. तर,3119 मिली मीटर
पाऊस धरण क्षेत्रात झाला होता. त्या तुलनेत यंदा पाऊस
कमी पडला आहे.
पवना धरणातील पाणी साठ्याची आजची आकडेवारी
- गेल्या २४ तासांत झालेला पाऊस – 108 मि.मि.
- 1 जूनपासून झालेला पाऊस – 1193मि.मि.
गेल्या वर्षी आजच्या तारखे पर्यंत झालेला एकूण पाऊस - 3119 मि मी
- धरणातील सध्याचा पाणीसाठा – 72.53% टक्के
-गेल्या वर्षी आजच्या तारखेचा धरणातील पाणीसाठा –
98.62% टक्के - गेल्या २४ तासात पाणीसाठ्यात झालेली वाढ
4.73% टक्के - 1 जूनपासून पाणीसाठ्यात झालेली वाढ – 37.24%
टक्के