पहिले गुटखा आता गांजा,अवैध धंदे बंदी कडे पोलीस प्रशासनाचे वाढते पाऊल….
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी गफ्फार शाह
चाळीसगाव(प्रतिनिधी)-दि 26 चाळीसगाव शहर पो स्टेशन हद्दीतील गोपाळपूरा भागात चोरटी गांजाची विक्री करणारा व गांजा बाळगणारा आरोपी नामे मांगीलाल मुरलीधर गुजर वय 52 वर्षे, राहणार- गोपालपुरा, चाळीसगाव हा गांजा विकत असल्याची चाळीसगाव शहर पोलिसांना माहिती प्राप्त झालेवरून मा. अपर पोलीस अधीक्षक श्री सचिन गोरे सो यांचे आदेशाने व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, चाळीसगाव विभाग श्री कैलास गावडे यांचे मार्गदर्शनाखाली चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री विजयकुमार ठाकूरवाड यांनी सहायक पोलिस निरीक्षक श्री मयूर भामरे, पोहेका गणेश पाटील, पोना भगवान उमाळे, पंकज पाटील, सुभाष घोडेस्वार, संदीप पाटील, पोशीसह दीपक पाटील, निलेश पाटील, विनोद खैरनार, विजय पाटील, संदीप पाटील व मपोशी सबा शेख यांचे घरी तसेच मा परी. तहसीलदार श्री सागर ढवळे सो व दोन पंच यांचे उपस्थितीत सदर आरोपीच्या घरी आज रोजी संध्याकाळी 6.00 वाजेच्या सुमारास छापा टाकला असता, आरोपीच्या राहत्या घरात रक्कम रुपये 6840 रुपयांचा 1 किलो 368 ग्रॅम गांजा व रोख रक्कम रुपये 21300 असा एकूण 28140 रुपयांचा मुद्देमाल मिळून आल्याने आरोपीविरुद्ध पोशी दीपक पाटील यांचे फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला NDPS कायद्यानुसार गुन्हा क्र 292/2020 एन डी पी एस कायदा 1985 चे कलम 8 क सह 20 बी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Related
More Stories
500 कोटी जलसाठा टीम च्या वतीने नदी पात्राची सफाई,सायकलिंग ग्रुप च्या वतीने 76 हजाराचे योगदान…
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक चाळीसगाव(प्रतिनिधी)- शहरातील तितूर व डोंगरी नदी पत्र अरुंद झाल्यामुळे मागच्या वर्षी अतिवृष्टी झाल्यामुळे...
गावठी दारू सह 4 लाख 71 हजार 350 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त यवत पोलिसांची कामगिरी
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक यवत-दि 13 मे 2022 रोजी गावठी हातभटटी दारूची वाहतुक करणाऱ्याला अटक करत,चार लाख...
चाळीसगाव येथे मंगळग्रह मूर्तीची प्राणप्रतिष्ठा,14 मे रोजी महाप्रसादाचे आयोजन…
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक चाळीसगाव(प्रतिनिधी)-शहरातील गांधी चौक येथील महादेव मंदिराराजवळ आज दिनांक 13 रोजी मंगळग्रह मूर्तीची प्रतिष्ठापना...
जिल्हा रुग्णालयात कैद्यांची हाणामारी, 4 पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन…
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक जळगाव- जिल्हा रूग्णालयात कैद्यांच्या दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारी प्रकरणी पोलीस कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा कर्तव्यात कसूर...
धक्कादायक शहरात बोगस क्लीनिकल लॅब व पॅथॉलॉजीस्ट चा सुळसुळाट, आरोग्य यंत्रणा गप्प का?
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक चाळीसगांव(प्रतिनिधी)-कुठलाही छोटा-मोठा आजार असो, अनेकदा आजाराचे अचूक आणि योग्य निदान होण्यासाठी रुग्णांच्या विविध...
विविध क्षेत्रातील ४३ मान्यवरांचा आदिलशाह फारुकी बहुउद्देशीय संस्थेतर्फे डॉ एपीजे अब्दुल कलाम पुरस्काराने सन्मान
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक जळगांव-जळगाव जिल्ह्यातील अडावद येथील नामांकित "आदिलशाह फारुकी बहुउद्देशीय संस्थे" मार्फत रविवार ८ मे...
Average Rating