पारोळा तालुक्यातील टोळी येथील तरुणीवर झालेल्या अत्याचार प्रसंगी चाळीसगाव तालुक्यातील चर्मकार समाजाच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन,आरोपींना फाशीच्या शिक्षेची मागणी

6 0
Read Time3 Minute, 36 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी गफ्फार शाह

टोळी(पारोळा)-टोळी ता पारोळा येथील 20 वर्षीय तरुणी ही पारोळा येथील लक्ष्मीबाई महाविद्यालयात प्रथम वर्ष विज्ञान शाखेत शिकत होती दिवाळीच्या सुट्टीत पारोळा येथे वास्तव्याला असलेले तिचे मामा त्यांच्याकडे तीन नोव्हेंबर पासून आली होती दिनांक 7 रोजी दुपारी अडीच वाजता मेडिकलवर जाऊन येते असे सांगून घरून निघाली,पण बराच उशीरा पर्यंत घरी न आल्याने तिचा सर्वत्र शोध घेतला पण तिचा तपास न लागल्याने तिच्या मामांनी दि 8 रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद केली , दि 8 रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास ती जुलूम पुरा येथे बालालबागच्या मळ्यात विहिरीजवळ बेशुद्ध अवस्थेत आढळून आली यावेळी याठिकाणी काही मुले क्रिकेट खेळत असताना त्यांना ही मुलगी दिसली त्यांनी लगेच मोटारसायकलीने तिला पाठवा कुटीर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले प्राथमिक उपचार करून तिला पुढील उपचारासाठी धुळे येथे भाऊसाहेब हिरे रुग्णालयात हलविण्यात आले तीन दिवस तिच्यावर उपचार झाले तिने मृत्यूशी झुंज दिली पण दि 10 रोजी पहाटे चार वाजता तिची प्राण ज्योत विझली सदर घटनेतील आरोपी शिवनंदन पवार त्यासोबत असलेले दोन जण पप्पू अशोक पाटील अशोक रावजी पाटील यांनी आळीपाळीने सामूहिक आत्त्याचार केला आरोपींवर फास्ट ट्रॅक कोर्टात चालावावा व आरोपींना फाशी व्हावी त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी व त्या पीडिताच्या कुटुंबाला संरक्षण मिळावे व कुटुंबातील व्यक्तींना सरकारने आर्थिक मदत घोषित करावी अशी मागणी चाळीसगाव तालुक्यातील चर्मकार समाज बांधव विविध संघटना कडून निषेध नोंदवून तहसीलदार साहेब यांना आज दि 12 रोजी निवेदन देण्यात आले

यावेळी आनंद गांगुर्डे,श्रीकृष्ण वाघ,नगरसेवक अरुण आहिरे,नगरसेवक रामचंद्र जाधव,प्राध्यापक गौतम निकम सर,मुकेश नेतकर,तुषार नकवाल,अशोक जाधव,मंगल जाधव,महिंद्र सूर्यवंशी, रोहित शिंदे ,प्रशिक कदम ,नितीन पवार ,शिवाजी गांगुर्डे ,स्वप्नील जाधव, मंगेश गांगुर्डे ,प्रशांत आहिरे ,सागर गांगुर्डे ,सिद्धार्थ मोरे, विशाल मोरे ,दत्तात्रय चौधरी, सोपान आहिरे ,गोकुळ अहिरे आदी उपस्थित होते

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.