संपादक गफ्फार मलिक(शेख)
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
पोलीस अधीक्षक अभयसिंग देशमुख यांनी आक्षेपार्ह स्टेटस ठेवणाऱ्या अल्पवयीन मुलांच्या पालकांची शाळा घेत जनजागृती चे जे कार्य केले आहे. ते कौतुकास्पद असून यामुळे नक्कीच भविष्यात होणाऱ्या आक्षेपार्ह घटना टाळल्या जाऊ शकतात.आपल्या या दूरदृष्टी मुळे नक्कीच पालकांमध्ये जागरूकता येऊन मुलांचे भविष्य वाचणार आहे.
चाळीसगाव(प्रतिनिधी)-आजचे धावते जग हे सोशल मिडीयामुळे खुपच जवळ आले आहे हे आपण सातत्याने ऐकतो. प्रत्येक व्यक्तीचे हातात मोबाईल आला आहे. यात सोशल मिडीयात तरूणपिढीतर आघाडीवर आहे. सोशल मिडीयातील फेसबुक, व्हॉटसअप, इंस्ट्राग्राम, आणि ट्विटर सारखी अनेक व्यसपिठे खुली झाली आहेत. याचा वापर चांगल्या प्रकारेही करता येतो मात्र यावर स्वतःच्या प्रसिध्दीसाठी गैरवापर जास्त प्रमाणात होतांना दिसुन येत आहे. अलीकडच्या काळात अल्पवयीन मुलाकडुन सोशल मिडीयावर आक्षेपार्ह पोस्ट करणे, घातक शस्त्र हातात घेवून ते फोटो इंस्ट्राग्राम, फेसबुक, व्हॉटसअप ग्रुपवर शेअर करणे, गुन्हेगारांचे उदात्तीकरण करणे, समर्थन करणे याचे प्रमाण खुपच वाढले आहे. आपल्या मित्रामध्ये रमन्याच्या वयात मुले तासतांस सोशल मिडीयावर अॅक्टीव राहत असल्याचे दिसुन येत आहे. सोशल मिडीयावर प्रसिध्दी मिळविण्यासाठी अनेक मुले काहीएक विचार न करता आक्षेपार्ह पोस्ट सेंड करतात. त्या व्हायरल करतात. त्यामुळे त्यांचेकडुन न कळत प्रचलित कायद्याच उलघन होत. व्हायरल केलेल्या पोस्ट मुळे सामाजिक तेढ निर्माण होतात. अशा मुलावर गुन्हे दाखल होवुन त्यांचे भविष्य धोक्यात येण्याची शक्यता असते याच बाबींचा विचार करून चाळीसगाव उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधिक्षक श्री. अभयसिंह देशमुख (IPS) यांच्या संकल्पनेतुन व चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनच्या माध्यमातुन चाळीसगाव तालुक्यात एक नविन उपक्रमास सुरूवात केली आहे.
उपक्रमानुसार दिनांक- २१ जानेवारी २०२३ रोजी चाळीसगाव शहरात सहाय्यक पोलीस अधिक्षक, उपविभागीय विशेष पोलीस पथक तसेच चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन कडील डी बी पथक, गोपणीय पथक यांनी सयुक्त रित्या उपक्रम राबवून फेसबुक, व्हॉटसअप, इंस्ट्राग्राम, या सोशल मिडीयावर व्हीडीओ, स्टेटस टाकणारे एकुण ०५ पाल्य व त्याचे पालक यांची उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय येथे शाळा घेतली. सदर मुलाचे मोबाईल तपासुन मोबाईलमधील आक्षेपार्ह व्हीडीओ व इमेज डिलीट केलेत. व त्याचे पालकांना सहाय्यक पोलीस अधिक्षक श्री. अमसिंह देशमुख यांनी सदर पाल्याचे भवितव्य खराब होवु नये म्हणुन साभार परत प्रमाणत्र देण्यात आले आहे.
अशाच प्रकारची पालकांची शाळा ही मोहीम सतत राबविणार येणार असल्याचे मानस देशमुख साहेबांनी व्यक्त केले आहे.