अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी सनी घावरी
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील रुग्ण
वाढ कोरोना हॉटस्पॉटमधील गर्दीवर आता ‘ड्रोन’द्वारे
नजर ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी पिंपरी चिंचवड पालिका पोलीस प्रशासनाची
मदत घेणार आहे. काही ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जात
नाही. अशा ठिकाणी कडक कारवाई करण्याचा इशारा
महापालिकेने दिला आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना चे रुग्ण जास्त प्रमाणात वाढत आहे.
शहराच्या विविध भागात रुग्ण वाढत आहेत.
आनंदनगर झोपडपट्टी, दापोडी, नेहरुनगर, विठ्ठलनगर,
भाटनगर, बौद्धनगर, रमाबाईनगर, वैभवनगर साईबाबानगर,
अजंठानगर, दिघी, बोपखेल, काळेवाडी हे भाग कोरोनाचे
हॉटस्पॉट म्हणून घोषित करण्यात आले आहेत.
दाट लोकवस्त्या, लहान घरे यामुळे अजूनही लोकांची वर्दळ
दिसून येत आहे. या भागातील नागरिकांकडून नियमांचे पालन
केले जात नाही. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका
आहे. त्यासाठी कंटेन्मेंट झोन आशा ठिकाणी लोकांच्या हालचालींवर आता ड्रोनद्वारे लक्ष
ठेवण्यात येणार आहे.
याबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी माहिती दिली, शहरातील हॉटस्पॉट
भागात मोठ्या संख्येने रुग्ण वाढ होत आहे. त्या भागात
‘कंटेनिंग’ करणे आवश्यक आहे. त्याठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढविण्यात येणार आहे.
त्याबाबत पोलिसांशी चर्चा झाली आहे. तिथे ड्रोनचा पण वापर
करण्याचा विचार केला आहे. ड्रोनद्वारे कंटन्मेंट झोनवर लक्ष
ठेवण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे पालन
केले जात नाही. आशा ठिकाणी नियमांचे पालन न करणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई केली
जाणार आहे.
नियमांचे पालन केले जात नसल्याने पिंपरी कॅम्प बंद केले
आहे. अन्य ठिकाणी नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास
आल्यास थेट तो भाग देखील सील केला जाणार आहे.
किमान तीन दिवसांसाठी सील केले जाईल. नागरिकांनी
आपली जबाबदारी ओळखली पाहिजे.सार्वजनिक ठिकाणे
थुंकणे, मास्क न घालणा-यांविरोधात कारवाई केली जात आहे.
दंडाच्या रकमेतही वाढ केली असल्याचे आयुक्त श्रावण
हर्डीकर यांनी सांगितले.