पीपल्स सोशल फाऊंडेशन च्या वर्धापनदिनी गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव- पीपल्स सोशल फाऊंडेशनच्या 7 व्या वर्धापनदिनानिमित्त डाॅ बाबासाहेब आंबेडकर माध्यमिक विद्यालयात गरजु व होतकरु विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमोद पाटील (संचालक दुध उत्पादक संघ) तसेच प्रमुख पाहुणे म्हणून मा. उपनगराध्यक्ष श्याम देशमुख, भगवान पाटील, नगरसेवक रामचंद्र जाधव ,दीपक पाटील व तसेच मिलिंद शेलार, प्रकाश पाटील, मुख्याध्यापक संजय वाघ,मुकेश नेतकर,विजय जाधव आदी उपस्थित होते. यावेळी प्रमोद पाटील,रामचंद्र जाधव,भगवान पाटील यांनी विचार व्यक्त केले तसेच फाऊंडेशनचे अध्यक्ष आकाश पोळ यांनी प्रास्ताविकात पीपल्स सोशल फाऊंडेशन च्या कार्याचा आढावा घेतला. गेल्या सात वर्षांत फाऊंडेशन च्या माध्यमातून राबवलेले विविध सामाजिक कार्यक्रम, स्वच्छता, महिला व बालविकासाचे कार्यक्रम, युवकांसाठीचे कार्यक्रम,महापुरुषांच्या विचारावरील प्रबोधनात्मक कार्यक्रम, माजी सैनिकांशी संबंधित राबवलेल्या कार्यक्रमांचा आढावा घेतला. व पुढेही विविध उपक्रम राबविण्याचे आश्वासन दिले.
दरम्यान कार्यक्रमात गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी फाऊंडेशनचे उपाध्यक्ष सागर पाटील, यज्ञेश बाविस्कर,अतुल चौधरी, मोहित भोसले, करण सुर्यवंशी, शुभम महाजन , अॅड. राहुल सावळे, भुषण पाटील, भुषण बाविस्कर, श्रीकांत आव्हाड, कुणाल पाटील, रोशन चव्हाण, राकेश त्रिभुवन, राकेश सरोदे, साहिल आव्हाड, सनी सरोदे, अजिंक्य जाधव, तुषार पाटील, प्रमोद सुर्यवंशी उपस्थित होते
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस. बी. सोनवणे यांनी केले तर, आभार प्रदर्शन भुषण पाटील यांनी केले.