Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

पुणे जिल्हयात घरफोड्या करणारे खुनासह दरोडा व घरफोडी चोरीचे तब्बल १९ गुन्हे दाखल असलेले दोघे सराईत गुन्हेगार जेरबंद पुणे ग्रामीण एलसीबी पथकाची कामगिरी

0
3 0
Read Time8 Minute, 5 Second


अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी विजय जाधव

दौंड(प्रतिनिधी)-पुणे जिल्हयात घरफोड्या करणारे खुनासह दरोडा व घरफोडीचे तब्बल १८ गुन्हे दाखल असलेल्या दोन सराईत अट्टल चोरट्यांना पुणे ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद करून ११ घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणल्याची माहिती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली.
दिनांक २६ मार्च २०२१ रोजी सकाळी ११.०० ते दुपारी ०१.०० वा. चे दरम्यान भिवरी ता.पुरंदर गावचे हद्दीत फिर्यादी सोपान मारुती भिसे वय ५० रा.भिवरी ता.पुरंदर जि.पुणे हे घराला कुलूप लावून बाहेर गेलेले असताना बंद घराचे कुलुप कोणीतरी अज्ञात चोरट्याने तोडुन घरामध्ये प्रवेश करुन कपाटामधील ठेवलेले सुमार १४ तोळे ५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम १०,०००/- असा एकूण ५,९०,०००/- (पाच लाख नव्वद हजार) रुपयाचा ऐवज चोरुन नेलेला होता. त्याबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन सासवड पोलीस स्टेशनला घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
सदर गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने गुन्हयाचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेमार्फत करणेबाबत पुणे जिल्हयाचे पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी सुचना दिलेल्या होत्या. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली नेमलेले सहा.पोलीस निरीक्षक सचिन काळे, चंद्रकांत झेंडे, महेश गायकवाड, निलेश कदम, सचिन गायकवाड, सुभाष राऊत, गुरु गायकवाड, सागर चंद्रशेखर, काशिनाथ राजपुरे यांचे पथकाने तपास सुरु केला. घटनास्थळी भेट देवून गुन्हयाची माहिती काढून तपास करीत असताना प्राप्त झालेल्या सीसी टीव्ही फुटेजवरुन सदरचा गुन्हा हा यापूर्वीचा रेकॉर्डवरील गुन्हेगार अजय अवचिते यानेच केला असल्याची खात्री झाली. त्यावरुन आरोपी अजय अवचिते याचे राहण्याच्या ठिकाणची माहिती काढून ढवळगाव ता.अहमदनगर, आलेगाव पागा ता.शिरुर, तांदूळवाडी ता.बारामती, खेंगरेवाडी ता.पुरंधर, म्हाडा कॉलनी सासवड, लोहियानगर पुणे, चिंचवड, घोरपडी, कोरेगाव पार्क पुणे या ठिकाणी जावून त्याचा शोध घेतला परंतु तो मिळून येत नव्हता. आज रोजी गुन्हे शाखेचे पथकास आरोपी अजय अवचिते व त्याचा एक साथीदार सासवड ता.पुरंधर येथे येणार असल्याची बातमी मिळालेवरुन वेषांतर करून त्या ठिकाणी जाऊन आरोपी नामे १) अजय राजू अवचिते वय २७ वर्षे रा.आलेगाव पागा, ता.शिरुर जि.पुणे व त्याचे सोबतचा साथीदार २) गणेश उर्फ ठोम्या गौतम भोसले वय २७ वर्षे आलेगाव पागा, ता.शिरुर जि.पुणे यांना सासवड ता.पुरंदर येथून सापळा रचून ताब्यात घेतले.
दोघे आरोपींकडे पोलीसी खाक्यामध्ये चौकशी केली असता अजय अवचिते याने त्याचा साथीदार मेहुणा गणेश उर्फ ठोम्या गौतम भोसले व पत्नी सिमा अजय अवचिते दोघे रा.आलेगाव पागा, ता.शिरुर जि.पुणे असे तिघे मिळून घरफोडया चो-या करण्यासाठी जायचे व पत्नी सिमा अवचिते ही चोरी करतेवेळी टेहळणीसाठी थांबायची असे सांगितले आहे. तसेच तिघे आरोपींनी एकत्र मिळून पुरंधर तालुक्यातील कोडीत, भिवरी, सासवड जयदिप कार्यालयजवळ व म्हाडा कॉलनी, दौंड तालुक्यातील दौंड, बोरीपार्धी, बारामती तालुक्यातील फोंडवाडा, हवेली तालुक्यातील किरकटवाडी, इंदापूर तालुक्यातील भिगवण, शिरूर तालुक्यातील नगर रोड एल अँड टी फाटा गॅस गोडावूनचे पाठीमागे या ठिकाणी बंद घराचे कूलूप कडीकोयंडा तोडून चोऱ्या केल्याचे तसेच बजरंगवाडी ता.बारामती येथे चोरी करण्यासाठी कूलूप तोडले परंतु लोक जागे झालेने पळून गेलेबाबत सांगितले आहे. त्याबाबत पोलीस स्टेशनकडील रेकॉर्डची पडताळणी केली असता त्यांनी एकूण ११ घरफोडीचे गुन्हे केल्याचे निष्पन्न झालेले आहे.
सदर आरोपींकडून सासवड ४, वडगाव निंबाळकर २, शिक्रापूर १, यवत १, भिगवन १, हवेली १, दौंड १ या पोलीस स्टेशनकडील घरफोडी चोरीचे एकूण ११ गुन्हे उघडकीस आणून गुन्हयातील आरोपींनी चोरलेले १३ तोळे ८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, ९ तोळे ४ ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने व एक गॅस सिलेंडर असा किंमत ५,३७,६००/- (पाच लाख सदोतीस हजार सहाशे) रुपयाचा मला जप्त करण्यात आलेला आहे.
दोन्ही आरोपी हे रेकॉर्डवरील सराईत अट्टल गुन्हेगार असून त्यांचेवर यापूर्वी हडपसर, लोणीकाळभोर, जेजूरी , बारामती शहर, बारामती तालुका, सासवड, भिगवण, खेड, यवत, शिरुर या पोलीस स्टेशनला खुनासह दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, चोऱ्या इत्यादी प्रकारचे एकूण १९ गंभीर गुन्हे दाखल आहेत.
अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना पुढील कारवाईसाठी सासवड पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आलेले आहे. सासवड पोलीस स्टेशन कडील दाखल गुन्हयांचा पुढील अधिक तपास सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप हे करीत आहेत.
सदरची कामगिरी ही पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, बारामती अपर पोलिस अधिक्षक श्री.मिलींद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, सहा. पोलीस निरीक्षक सचिन काळे, चंद्रकांत झेंडे, महेश गायकवाड, निलेश कदम, सचिन गायकवाड, सुभाष राऊत, गुरु गायकवाड, सागर चंद्रशेखर, काशिनाथ राजपुरे यांनी केलेली आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: