पुणे जिल्हा कास्ट्राईब शिक्षक महासंघाच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी श्रीमती सुनिता काटम व महासचिवपदी श्रीमती सुषमा तरटे यांची निवड .

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी विजय जाधव
पुणे(प्रतिनिधी)-पुणे जिल्हा कास्ट्राईब शिक्षक महासंघाच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी श्रीमती सुनिता काटम व महासचिवपदी श्रीमती सुषमा तरटे यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती महासंघाचे राज्याध्यक्ष गौतम कांबळे यांनी दिली .आमच्या प्रतिनिधीशी सविस्तरपणे बोलताना गौतम कांबळे म्हणाले की ,सुनिता काटम या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव बांडे येथे कार्यरत असून त्यांना दौंड पंचायत समितीचा गुणवंत शिक्षका पुरस्कार मिळालेला आहे .तसेच श्रीमती सुषमा तरटे या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आलेगाव पुनर्वसन येथे कार्यरत आहेत . श्रीमती तरटे यांनाही दौड पंचायत समितीचा गुणवंत शिक्षिका पुरस्कार मिळाला आहे .श्रीमती सुनिता काटम व श्रीमती सुषमा तरटे यांच्या निवडीबद्दल शिक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे .यापुढे संघटना वाढीसाठी प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे श्रीमती काटम व श्रीमती तरटे यांनी सांगितले .
यावेळी जिल्हाध्यक्ष विनोद चव्हाण ,राज्य कार्याध्यक्ष चंद्रकांत सलवदे ,राज्य कोषाध्यक्ष दादासाहेब डाळींबे ,राज्य उपाध्यक्ष राहुल गायकवाड ,जिल्हा उपाध्यक्ष दीपक कदम ,बारामती तालुकाध्यक्ष विनोदकुमार भिसे व महासचिव सतीश शिंदे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते .