वरवंड(प्रतिनिधी):- पुणे सोलापूर महामार्गाच्या सेवा रस्त्यावर अपघात होऊन दुचाकी व इतर वाहनांचे नुकसान झाले.मात्र सुदैवाने मोठी जीवितहानी टळली आहे. याबाबत असे की AR 01 J 5686 ही बस तेलंगणा येथून मुंबई कडे सुनिल कुमार नटवरसिंग राणा हा;ट्रॅव्हल्स बस घेऊन निघाला होता.बसमध्ये कोणी प्रवाशी नसल्याने मोठा अनर्थ टळला आहे.मात्र पुणे सोलापूर महामार्गावर दौड तालुक्यातील चौफुला येथे आला असता चालकाचे वेगावरील नियंत्रण सुटले.आणि बस सेवा रस्त्याच्या बाजूला असलेल्या छोट्या व्यवसाईकांच्या दुकानांना घासत गेली.आणि दुचाकी गॅरेज समोरील दहा दुचाकीना;धडकत जाऊन ही बस गॅरेजमध्ये घुसली यामध्ये गॅरेजच्या १० दुचाकींसह इतर मोठ्या वाहनांचे मोठे नुकसान झाले.या अपघात ग्रस्त सेवा रस्त्यावर वाहनांचे रेडियम सजावट,वेल्डिंग,गिरणी,किराणा दुकान,गॅरेज फ्लेक्स अशी दुकाने आहेत.या घटनेचा पोलिसांनी पंचनामा केला आहे.
पुणे सोलापूर महामार्गावर ट्रॅव्हल बस चालकाचा ताबा सुटल्याने अपघात

Read Time1 Minute, 31 Second