पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांची आठवण सतत हृदयात तेवत राहावी यासाठी शिवनेरी फाउंडेशन तर्फे एक दिवा,एक पणती कार्यक्रम संपन्न

1 0
Read Time2 Minute, 2 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

उपसंपादक रोहित शिंदे

चाळीसगांव(प्रतिनिधी)-दि १४ फेब्रुवारी सगळीकडे वेलेन्टाइन डे साजरा होत असताना त्याच दिवशी पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात भारतमातेच्या वीर जवानांना हौतात्म्य प्राप्त झाले होते. त्यांची आठवण सतत हृदयात तेवत राहावी यासाठी शिवनेरी फाउंडेशन च्या वतीने चाळीसगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे “एक दिवा… एक पणती… आपल्या शहीद जवानांसाठी..!!! हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मेणबत्ती लावून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. भारत माता की जय,वंदे मातरम्, जवान तुझे सलाम च्या घोषणा देत उपस्थित शिवनेरी फाउंडेशन च्या सदस्यांनी आपल्या जवानांचे स्मरण केले.

यावेळी शिवनेरी फाउंडेशन च्या अध्यक्षा प्रतिभा ताई मंगेश चव्हाण, भाजपा जळगाव जिल्हा महिला अध्यक्ष सौ.रेखाताई पाटील, नगरसेविका सौ.विजयाताई प्रकाश पवार, सौ.विजयाताई भिकन पवार, सौ.योजना ताई पाटील, सौ.सोनल ताई वाघ, सौ.मनिषा ताई पाटील, भाजपा शहर सरचिटणीस अमोल नानकर, विपुल पाटील, तुषार देसले, सूर्यकांत शेलार, सौरभ पाटील, मयुर पाटील, अजय अहिरे, धिरज पवार, यश चिंचोले, मयुर घोरपडे, सागर पगारे आदी उपस्थित होते.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.