अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
संपादक गफ्फार मलिक(शेख)
चाळीसगाव( प्रतिनिधी)-शहरातील पोलीस स्थानकाचे निरिक्षक के. के. पाटील यांची नियंत्रण कक्षातून पुन्हा एकदा चाळीसगांव शहर पोलीस निरीक्षक पदावर वापसी झाली असून रोटरी क्लब,जॉगिंग ग्रुप व सायकलिंग ग्रुप तर्फे त्यांचे स्वागत करण्यात आले.
चाळीसगाव येथील पोलीस निरिक्षक के. के. पाटील यांना ७ जुलै रोजी पोलीस नियंत्रण कक्षात बदली करून पाठविण्यात आले होते. पाटील यांनी अतिशय दक्ष पोलीस अधिकारी असून शहरात आपल्या कार्याचा ठसा उमटवत आपली पकड मजबूत केली,एखाददोन वादग्रस्त प्रसंग जरी घडले असले तरी त्यांची कामगिरी जनतेच्या हिताशी संबंधित अशी आहे त्यांच्या नियंत्रण कक्ष येथे झालेल्या बदली मुळे शहरात नाराजीचे वातावरण होते,मात्र पंधरा दिवसात ते पुन्हा एकदा चाळीसगाव पोलीस स्थानकाला रूजू झाल्याने शहरात आनंदाचे वातावरण आहे.
दरम्यान पोलीस निरिक्षक के. के. पाटील यांचे शहर पोलीस स्थानकाच्या आवारात रोटरी क्लब,जॉगिंग ग्रुप व सायकलिंग ग्रुप तर्फे स्वागत करण्यात आले व त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार पुन्हा एकदा सांभाळला आहे.