प्रांतपाल डिस्ट्रिक गव्हर्नर यांच्या विशेष उपस्थितीत जागतिक मधुमेह दिन व बालदिन रोटरी क्लब चाळीसगाव तर्फे साजरा.

Read Time4 Minute, 0 Second

दिनांक 14 नोव्हेंबर 2019 गुरुवार रोजी जागतिक मधुमेह दिन व बालदिनाचे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ चाळीसगाव तर्फे विविध समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात आले. त्यामध्ये प्रामुख्याने रिक्षा ड्रायव्हर व क्रुझर ड्रायव्हर्स यांना फर्स्ट एड किट व लाइफ सेविंग किट रोटरी 3030 चे मा. प्रांतपाल राजेंद्रजी भामरे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यामध्ये परदेशी एक्सीडेंट हॉस्पिटलचे डॉ गौरव परदेशी यांचे विशेष सहकार्य व मार्गदर्शन लाभले. व बापजी जीवनदीप मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल येथे जागतिक मधुमेह दिनाचे औचित्य साधून मोफत डायबिटीज मधुमेह व हृदयरोग तपासणी शिबिर यांचे आयोजन करून जवळपास 76 रुग्णांना त्याचा लाभ देण्यात आला यामध्ये डॉ. सुधन्वा कुलकर्णी व डॉ. शैलेंद्र महाले यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णांना मोफत तपासणी व औषधोपचाराचा लाभ देण्यात आला. त्यानंतर बालदिनाचे औचित्य साधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर माध्यमिक विद्यालय येथे रोटरी क्लब चाळीसगाव संचलित इंटरॅक्ट क्लब ची स्थापना करण्यात आली व विद्यार्थ्यांना सामाजिक वसा जोपासण्याची शपथ यावेळी प्रांतपाल राजेंद्रजी भामरे व असिस्टंट गव्हर्नर राहुल जी कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना देण्यात आली. त्यानंतर सायंकाळी रोटरी क्लबचे पदाधिकारी यांची क्लब असेंबली रोटरी हॉल येथे प्रांतपाल श्री राजेंद्रजी भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली व अध्यक्षतेखाली अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. पब्लिक मीटिंग मध्ये संबोधित करताना रोटरी क्लब ऑफ चाळीसगाव च्या माध्यमातून नेहमीच चाळीसगाव करांचे सामाजिक स्वास्थ्य टिकवून ठेवण्याचे कार्य हे होत असते अशा पन्नास वर्षे परंपरा असलेल्या क्लबचे त्यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले व अशाप्रकारे उत्तरोत्तर सामाजिक कार्याचा वसा जोपासण्यासाठी डिस्ट्रिक्ट कडून नेहमीच सहकार्य राहील असे आश्वासन व शुभेच्छा त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात दिल्या. सरतेशेवटी विविध सामाजिक कार्यक्रमांच्या माध्यमातून सामाजिक जडण-घडण करण्याचा उदात्त हेतू रोटरी परिवारातर्फे नेहमीच केला जातो असे प्रतिपादन रोटरी क्लब ऑफ चाळीसगाव चे अध्यक्ष डॉ. संदीप देशमुख यांनी आपल्या आभार प्रदर्शनात केले.
यावेळी दिवसभर चाललेल्या कार्यक्रमात सचिव रोशन ताथेड, रोटे राजेंद्र कटारिया, रोटे मधुकर कासार, रोटे सुभाष जाधव, रोटे संजय चौधरी, रोटे संजय अग्रवत, रोटे नरेंद्र शिरोडे, रोटे ब्रिजेश पाटील आदींचे विशेष सहकार्य लाभले.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.

Previous post महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या लढ्याला अखेर यश
Next post क्या आपने इन्हे देखा है?
error: Content is protected !!
%d bloggers like this: