अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
उपसंपादक रोहित शिंदे
जळगाव(दि 29)- येथे राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ ट्रेड युनियनची विंग प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना (प्रोटान)चे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले स्मृती दीना निमित्त पहिले जिल्हा अधिवेशन व राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फूल आदर्श शिक्षक व शिक्षकेतर पुरस्कार तसेच माता सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कारा वितरण करण्यात आले या प्रसंगी प्रोटान संघटनेचे जिल्हा अध्यक्ष मा.मिलिंद भालेराव सर यांनी संघटने प्रति आपले विचार मांडले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रोटान संघटनेचे कार्यध्यक्ष मा.मुबारक शहा यांनी केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रोटान संघटनेचे राज्य उपाध्यक्ष मा जी पी काकडे हे होते त्यांनी अध्यक्षयी भाषण करताना शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेगवेळ्या समस्यावर प्रकाश टाकला तसेच शिक्षकांना अध्यापन ऐवजी सरकार इतर कामात गुंतवत असल्या मुळे आज जि.प.शाळा ओसट पडू लागल्या आहे सरकारने शिक्षकांना ज्ञानदानाचे काम करू द्यावे तसेच अनुकम्प धारकाना सेवेत सामावून घेण्यात यावे दि ११/१२/२०२१ चा शासन निर्णय रद्द करावा आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी भरती वेतन श्रेणी वर करण्यात यावी २०१२ पासून रखडलेली शिक्षक भरती लवकर लवकर करावी
आज घडीला माध्यमिक शिक्षण विभाग चालू असलेला भोगड करोभर बंद व्हावा सर्वसाधारण कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा वैदयकीय बिल काढण्यात यावे सेवा जेष्ठते संदर्भात आलेल्या तक्रारींवर न्याय द्यावा SC/ST/SBC/NT च्या कर्मचाऱ्या संदर्भात सहानुभूती पूर्वक विचार व्हावा
सरकारने सन २००५ नंतर सेवेत आलेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना लागू करून त्यांच्यावरील अन्याय दूर करावा अन्यथा भविष्यात जुनी पेंशन करीत राज्य भर आंदोलन पुकारले जाईल तसेच शिक्षकांचे वेतन राष्ट्रीयकृत बँकेत करण्यात यावे या सह अनेक विषयांवर प्रकाश टाकण्यात आला
अधिवेशनसाचे उदघाटन माध्यमिक शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण मॅडम यांनी केले तर अधिवेशनाला प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी शुभेच्छा दिल्या तसेच विस्तार अधिकारी रागिणी चव्हाण मॅडम ,गटशिक्षणाधिकारी दीपाली पाटील मॅडम देखील कार्यक्रमास उपस्थित होत्या या सर्व मंडळींच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रोटान संघटनेचे महासचिव मा मिलिंद निकम सर व निकम मॅडम यांनी केले व तर आभार प्रोटान संघटनचे जिल्हा उपाध्यक्ष अजय पाटील सर यांनी मानले कार्यक्रमा यशस्वी करण्यासाठी प्रोटान संघटनेच्या जिल्हा कार्यकारणीतील व तालुका कार्यकारणीतील सदस्य मा यशराज निकम सर ,राहुल जाधव,आनंदकुमार जाधव,बाळू लहासे सर,अस्लम ताहेर सर,रहीम सर,उमेश दांडगे सर,मनोज तायडे सर,अनिल सोनवणे,राजू सोनवणे,विजय कोळी,भीमराव सुरवाडे, महेंद्र तायडे,मुनाफ तडवी,सोपान भवरे,दिपक तायडे,खुमानसिंग बारेला,गोपाळ कोळी,दंगलदास सोनवणे विलास पाटील यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमास मोठ्या संख्येने शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी उपस्थिती लावली होती