अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
महिला प्रतिनिधी दौंड योगिता रसाळ
दौंड(प्रतिनिधी)-पाच वर्षापासून प्रेम प्रकरण सुरू असताना आपल्या बहिणीशी लग्न करण्यास नकार दिल्याने तिने आत्महत्या केल्याची फिर्याद तरुणीचा भाऊ कौशल मोरोपंत गायकवाड, यांनी दौंड पोलीस स्टेशनला दिल्यामुळे आरोपी निखिल साबळे या तरुणावर आत्महत्येस प्रवृत्त केलेचा गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मयत व्यक्ती ही डीएमएलटी या विभागात आनंद हॉस्पिटल दौंड येथे कामात होती. दिनांक ११ मार्च २०२३ रोजी माझी बहीण साक्षी टेन्शनमध्ये दिसल्याकारणाने मी तिला विचारले असता तिने सांगितले की,निखिल साबळे या मुलासोबत माझे गेल्या पाच वर्षापासून प्रेम संबंध आहेत.मला त्याच्यासोबत लग्न करायचे आहे पण, तो टाळाटाळ करीत असून, लग्न करायला तयार नाही,त्यामुळे माझी आता जगण्याची इच्छा नाही असे ती म्हणत होती,
परंतु फिर्यादीने तिची समजूत काढली आणि रात्री सर्वजण जेवण करून झोपी गेलो.
त्यानंतर दिनांक १२ मार्च २०२३ रोजी सकाळी सहा वाजता झोपेतून उठून पाहिले असता घराचा दरवाजा बाहेरून बंद होता. व बहिण घरात नसल्याचे दिसून आले, बहिण साक्षी घरामध्ये नव्हती, त्यामुळे मी शेजारील सोहेल शेख यांना फोन करून घराचा दरवाजा उघडण्यास सांगितले.दार उघडल्यानंतर टेरेसवर जाऊन सगळीकडे पाहिले असता साक्षी कुठेच दिसली नाही, त्यावेळी मी टेरेसवरून खाली पाहिले असता, बहीण साक्षी खाली रक्तभांबल अवस्थेत खाली पडलेली दिसली, त्यावेळी खाली येऊन आम्ही साक्षीला आनंद हॉस्पिटल येथे घेऊन गेलो, असता डॉक्टरांनी मात्र ती औषधापूर्वीच मयत असल्याचे सांगितले.
त्यामुळे साक्षी गायकवाड हीचा आरोपी निखिल साबळे (रा- मोरे वस्ती,ता- दौंड, जि- पुणे )याने साक्षी सोबत लग्न करण्यास नकार देऊन तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्ती केले असल्याने फिर्यादीचे म्हणणे वरून दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक चौरे मॅडम करत आहेत.