Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

भावी खासदार यांचे आभार मानण्यासाठी सोशल मीडियावर शेअर होत आलेल्या पत्रकातून माजी खा उन्मेष पाटील यांचा फोटो गायब….

0
0 0
Read Time2 Minute, 47 Second

संपादक गफ्फार शेख(मलिक)

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

चाळीसगाव(प्रतिनिधी)-आज संध्याकाळी सहा वाजता जळगांव  लोकसभा निवडणूक संपताच महाविकास आघाडीचे उमेदवार करण पवार यांना माजी खासदार उन्मेष पाटील यांचा विसर मतदारांचे आभार मानण्यासाठी सोशल मीडियावर शेअर होत असलेल्या पत्रकात माजी खासदार उन्मेष पाटील यांचा फोटोच नाही.

सोशल मीडियावर महविकास आघाडीचे कार्यकर्ते मतदार जनतेचे आभार मानण्यासाठी

“धमकी, दडपशाही, अमिषं आणि सत्तेच्या बळावर सुरु असलेला पैशांचा खेळ या सगळ्या गोष्टींच्या नाकावर टिच्चून मतदान केलेल्या सर्व स्वाभिमानी मतदारांचे मनापासून आभार!

लोकशाहीच्या उत्सवात मतदार, कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी दिवसभर ज्याप्रकारे मेहनत घेतली त्याचा मनापासून अभिमान वाटतो! कार्यकर्त्यांनी गेले महिनाभर दिवसरात्र कष्ट घेतले, त्यांच्या ऋणातून उतराई होणे शक्य नाही.

या शिवाय महाविकास आघाडीचे सर्व नेतेगण ज्यांनी सहकार्य केले त्यांचेही मी आभार व्यक्त करतो. सर्वपक्षीय नेते, ज्यांनी अप्रत्यक्षपणे सहकार्य केले, त्यांच्या मी ऋणात राहू इच्छितो.

सर्व प्रसारमाध्यमे, प्रशासन, यांचे विनम्र आभार !

तुमच्या मेहनतीचं फळ 4 जून रोजी मिळाल्याशिवाय राहणार नाही. आपल्या सर्वांच्या साथीनं विजयाचा गुलाल आपणच उधळणार यात शंका नाही.

पुनश्च सर्वांचे विनम्र आभार!”

असे लिहिलेले पत्रक सोशल मीडियावर शेअर केले जात आहेत मात्र पत्रकात माजी खासदार उन्मेष पाटील यांचा फोटो नसल्याने जनतेत आश्चर्य व्यक्त होत आहे,निवडणूक प्रक्रिया नुसतीच आज संध्याकाळी 6 वाजता संपली असून इतक्या लवकर भावी खासदारांना माजी खासदार पाटील यांचा विसर पडेल असे वाटले नव्होते मात्र नेमक कोणाचे चुकले काय चुकले अश्या अनेक चर्चांना उधाण आले आहे.

Happy
Happy
50 %
Sad
Sad
50 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: