मनोज जरांगे पाटील यांना दीर्घायुष्य लाभो यासाठी लक्ष्मी मातेची मराठा महासंघाच्या वतीने विधिवत पूजा

संपादक गफ्फार शेख(मालिक)
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
चाळीसगाव(प्रतिनिधी)-अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांना दीर्घायुष्य लाभावे म्हणून नारायणवाडी येथील लक्ष्मी आईचे विधिवत पूजन दिनांक 9 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 11 करण्यात आले.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून जालना अंतरवली सराटी येथील मनोज जरांगे पाटील हे गेल्या 10-12 दिवसापासून उपोषणास बसले आहे. आपल्या कुटुंबाची परवा न करता समाजासाठी त्यांनी आपल्या जीवाची पर्वा केली नाही. संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा बांधव, भगिनी मनोज जरांगे पाटील यांचे कौतुक करीत आहे. व महाराष्ट्रातून त्यांना मोठा पाठिंबा दिला जात आहे.मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या परिवाराची व स्वतःच्या जीवाची परवा केलेली नाही. अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांना दीर्घायुष्य लाभो म्हणून नारायणवाडी येथील लक्ष्मी आईची विधिवत पूजन करण्यात आली. मराठा महासंघाच्या अनिताताई शिंदे यांनी आपल्या मनोगत सांगितले की, राज्य सरकारने मराठा समाजाचा आरक्षणा बाबत तातडीने निर्णय घ्यावा. मराठा बांधव व माता-भगिनी यांचे वर लाठीचार करणाऱ्या पोलिसांना सेवेतून बरतर्फ करावे असे म्हणून छत्रपती शिवाजी महाराज की जय एक मराठा लाख मराठा अशा घोषणा दिल्यात. अन्यथा राज्य सरकारला याची मोठी किंमत मोजावी लागेल. यावेळी मराठा महासंघाचे शहर अध्यक्ष खुशाल बिडे,शहर उपाध्यक्ष कैलास पाटील, शहर सचिव नंदकिशोर जाधव, मराठा महासंघाचे महिला आघाडीच्या अनिताताई शिंदे, मनीषा मनीषा ताई महाजन, रत्नाताई पाटील, रत्नाताई पिलोरे,सीमाताई पवार,छायाताई पनमन,सुमित कापसे,प्रदीप जगताप ,कैलास देशमुख आदी मराठा बांधव व भगिनी उपस्थित होते.