अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
संपादक गफ्फार मलिक
चाळीसगाव —-खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या माध्यमातून ब्राम्हणशेवगे गावासाठी २५१५च्या निधी मधुन रस्त्यासाठी रू दहा लाख मंजुर करण्यात आला होता.परंतु ग्रामस्थांनी स्मशानभुमीकडे जाण्याऱ्या रस्त्याची अडचण पाहता या मार्गासाठी रस्त्याची निर्मिती केल्याने गावातील दुःखद घटनेप्रसंगी अंत्ययात्रेला जाताना गावकऱ्यांना होणाऱ्या मरणानंतरच्या मरण यातना संपल्या आहेत.
” शेवटचा प्रवास सुद्धा खडतर”
ब्राम्हणशेवगे गावातील स्मशानभूमीकडे जाण्यासाठी असलेला रस्ता धामणी नदीवर आहे. ती नदी ओलांडून स्मशानभुमीत प्रेतयात्रा नेणे म्हणजे ” शेवटचा प्रवास सुद्धा खडतर” अशी परीस्थिती होती.परंतु हा सगळा प्रवास गावकऱ्यांनी खासदार उन्मेश दादा पाटील यांचे कडे मांडला. सार्वजनिक बांधकाम अधीकारी यांच्या निर्देशनास आणून देत गावकऱ्यांनी अशक्य काम शक्य करीत रस्त्याचे काम मार्गी लावले.
आजच्या या महामारीत अंत्य:यात्रेला जाणे कठीण त्यात वरून येणारा पाऊस आता हे प्रेत न्यायचे तरी कुठे ? कारण स्मशानभूमी कडे जाणारा रस्ता पाण्याखाली गेला की मार्ग बंद ?? असा प्रश्न निर्माण व्हायचा परंतु हे शक्य झाले केवळ उन्मेशदादाच्या दूरदृष्टीमुळे अशी भावना आज ब्राम्हणशेवगे गावकरी व्यक्त करीत आहे.
गावकऱ्यांची एकजूट या रस्त्याच्या निर्मिती मुळे आज गावकऱ्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.प्रसंगी आम्ही भांडलो. वादही घातले. रुसवे फुगवे ही झाले. परंतु हे केवळ अन केवळ शक्य झालेच नाही तर केलेही यात खासदार उन्मेश दादा पाटील यांची आम्हाला भक्कम साथ लाभली. आमच्या ग्रामस्थाचा सरपंच व उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य, यांच्या सामूहिक प्रयत्नांतून किमान शेवटचा प्रवास तरी गोड व्हावा अशा आशयाप्रमाणे हा पुल तयार केल्याबद्दल ग्रामस्थासह खासदार उन्मेश दादा पाटील यांचे अधीकारी वर्गाचे आभार व्यक्त करतो अशी भावना भाजपचे तालुका चिटणीस रत्नाकर उध्दवराव पाटील ब्राम्हणशेवगा यांनी व्यक्त केली आहे.