महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य संकुल परीसरातील 30 खाटांचे अद्ययावत ग्रामीण रुग्णालय व ट्रामा केअर सेंटर बांधकामाची खासदार उन्मेश दादा पाटील यांनी केली पाहणी

Read Time8 Minute, 22 Second


चाळीसगाव — तालुक्यातील नागरिकांची अनेक वर्षांपासून मागणी असलेल्या सुसज्ज अश्या 30 खाटांचे ग्रामीण रुग्णालय व ट्रॉमा केअर सेंटर ची मागणी अखेर पूर्ण होणार असून ग्रामीण रुग्णालयासाठी १२.५० कोटी, ट्रॉमा केअर सेंटर २.३६ कोटी निधीतुन या इमारतींचे अतिशय सर्व सोयीसुविधा युक्त बांधकाम अंतिम टप्यात आहे.आज खासदार उन्मेश दादा पाटील यांनी महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य संकुलाची पाहणी केली.येत्या काळात हे ग्रामीण रुग्णालयाला उप जिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन केंद्रीय पेट्रोलियम प्राकृतिक गॅस तसेच सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्रालयाचे स्टँडिंग कमेटी सदस्य खासदार उन्मेश दादा पाटील यांनी केले आहे.

विस्तीर्ण देखणी इमारत

खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या संकल्पनेतुन शासकीय दूध योजनेच्या जागेत ही विस्तीर्ण इमारत साकारली जात असून येथून लवकरच सर्व सामान्य रुग्णांना उच्च दर्जाची वैद्यकीय सुविधा मिळणार असल्याने तालुक्यावासीयांचे लक्ष लागून आहे.आज या पाहणी प्रसंगी खासदार उन्मेश दादा पाटील यांचे समवेत माजी शिक्षण सभापती पोपट तात्या भोळे, मा..प .स. सदस्य दिनेश बोरसे, भाजप शहराध्यक्ष तथा नगरसेवक घृष्णेश्वर पाटील, नगरसेवक गटनेते संजय राजपूत, माजी प.स सदस्य संभाजीराजे पाटील, मारोती काळे,नगरसेवक अरुण अहिरे, माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी, नरेंद्रकाका जैन, राष्ट्रीय समाज पक्ष जिल्हाध्यक्ष गणेश जाणे, अक्षय मराठे,रवी चौधरी, भूषण चित्ते, कपिल पाटील, बबडी शेख, सोनू अहिरे, अमोल मराठे, बंडू पगार, कैलास गावडे, अजय वाणी, दिनकर राठोड ,गिरीश ब-हाटे, विशाल सोनगिरे, ज्ञानेश्वर पाटील, पंजाबराव अहिरराव,गणेश महाले,बबलू पाटील पाचोरेकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

ट्रामा केअर सेंटर व ग्रामीण रूग्णालय रूग्णांना एकाच ठिकाणी सर्व सुविधा मिळणार

चार जिल्ह्याच्या सिमेवर असलेल्या चाळीसगाव तालुक्याचे मोठे भौगोलिक महत्व आहे. पाचोरा, भडगाव, नांदगाव, कन्नड या शेजारच्या तालुक्यांचा परिसर जोडला गेलेला आहे. जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका म्हणून चाळीसगाव परिचीत आहे. परंतु गेल्या पाच वर्षांपूर्वी शासकीय आरोग्य सेवेच्या बाबतीत मात्र मागे पडल्याचे चित्र होते. ही बाब तत्कालीन आमदार उन्मेश दादा पाटील यांनी ओळखली होती. त्या अनुषंगाने भक्कम पाठपुरावा करून नागरिकांच्या आरोग्याच्या सुविधेसाठी एकमेव विस्तीर्ण ग्रामीण रूग्णालय साकारले जाते आहे. या ठिकाणी रूग्णालयात महिलांची प्रसूती, बालकांचे लसीकरण, रक्त, लघवी तपासणी, शवविच्छेदन तसेच सर्वच आजारांवर उपचार केले जातात. या ग्रामीण रूग्णालयामध्ये शहर तसेच खेड्यापाड्यातील गोर-गरीबांची मोठी सोय होणार असल्याने लवकरच हे रुग्णालय कार्यान्वित होणार आहे.

परिसरातील अपघाती रुग्णासाठी वरदान

चाळीसगाव मध्य रेल्वेच्या प्रमुख मार्गावरील जंक्शन स्थानक असून धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्र.२११ तालुक्यातून जातो. तसेच उत्तर महाराष्ट्रातील सर्वात अवघड वळणाचा कन्नड घाट याच तालुक्याच्या सिमेवर असल्यामुळे सतत अपघात होत असतात. ट्रामा केअर सेंटर सुसज्ज असे रूग्णालय नसल्याने तसेच ग्रामीण रूग्णालयातील सुविधा अपुऱ्या असल्याने गंभीर रुग्णांना ६० कि.मी.अंतरावरील धुळे अथवा जळगाव, नाशिक येथे रवाना करावे लागत होते. त्यामुळे रुग्ण दगावण्याचे प्रमाणदेखील मोठे होते.या सुसज्ज रुग्णालयामुळे वेळीच उपचार मिळणे सुकर होणार आहे.अपघातातील रूग्णांवर तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार, सोनोग्राफी एक्स-रे अशा विविध सुविधा रूग्णांना मिळणार आहे

अतिभव्य रुग्णालय
सोळा हजार स्क्वेयर फुटांमध्ये दहा खाटांचे ट्रामा केअर सेंटर आणि ३६ हजार स्क्वेअर फुट जागेवर ३० खाटांचे ग्रामीण रूग्णालय बांधकाम सुरू आहे. ग्रामीण रुग्णालयात जनरल वाॅर्ड, पुरूष महिला वाॅर्ड, सर्जिकल ओपीडी, एक्सरे रूम, पॅथोलॉजी लॅब, ऑपरेशन थिएटर, मेडिकल स्टोर, क्रिटिकल केअर आदी सर्व सुविधा असणार आहेत. रुग्णालयाचे संपूर्ण बांधकाम हे आरसीसीमध्ये करण्यात आले असून संपूर्ण रुग्णालयामधील फर्निचर काम प्रगतीपथावर आहे. या परिसरात बगीचा साकारला जाणार असून संपूर्ण संरक्षक भिंतीचे काम पूर्ण झाले असून या कामाची पाहणी खासदार उन्मेश दादा पाटील यांनी केली.

.

महात्मा फुलेंचा पुतळा उभारणार

महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले दाम्पत्याने दबलेल्या – पिचलेल्या समाजाच्या उन्नतीसाठी आपले आयुष्य वेचले, सावित्रीबाईनी तर पुण्यात प्लेग ची साथ आलेली असताना रुग्णसेवा करत आपल्या प्राणांची आहुती दिली. सदर आरोग्य संकुलाला महात्मा ज्योतिबा फुले यांचे नाव देऊन त्यांनीं केलेल्या महान कार्याला मानवंदना देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. ग्रामीण रुग्णालय व ट्रामाकेअर सेंटरची मागणी पूर्ण होत असताना मनस्वी आनंद होत आहे. ट्रामा केअर सेंटर व ग्रामीण रुग्णालय सेवेत एक मोलाची भर यामुळे पडेल आपत्कालीन सेवेमुळे रुग्णांना त्याचा अधिक फायदा होईल.या ग्रामीण रुग्णालयास उप जिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळावा यासाठी प्रयत्नशील असल्याची भावना खासदार उन्मेश दादा पाटील यांनी या प्रसंगी दिली

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.

Previous post पाचोरा शहरातील अस्वच्छतेच्या निषेधार्थ माजी सैनिक स्वच्छतेसाठी उतरले रस्त्यावर न.पा.प्रशासन आता तरी जागे होईल का?
Next post शासकीय कार्यालय 7 दिवस बंद ठेवण्याचा राज्य सरकारचा निर्णय?
error: Content is protected !!
%d bloggers like this: