अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
उपसंपादक रोहित शिंदे
पुणे-महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाच्या वतीने शिक्षण आयुक्त कार्यालय सेंट्रल बिल्डिंग पुणे येथे दिनांक 23 मे 2022 रोजी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले .हे धरणे आंदोलन पुढील प्रमुख मागण्यांसाठी करण्यात आले .
*प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत व आंतरजिल्हा बदल्या लवकरात लवकर करण्यात याव्या .
*पुणे जिल्हा परिषदेमध्ये मुख्याध्यापक पदोन्नती तात्काळ करण्यात यावी
*covid-19 मध्ये कर्तव्य बजावताना मृत्युमुखी पडलेल्या शिक्षकांच्या कुटुंबीयांना पन्नास लाख रुपये विमा योजनेचा लाभ देण्यात यावा .
*शिक्षण सेवकांचे मानधन पंचवीस हजार रुपये करण्यात यावे .
*सर्व विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत वाढ करण्यात यावी .
गट साधन केंद्रातील कंत्राटी तत्वावरील कामगारांना सेवेत कायम करण्यात यावे .
धरणे आंदोलनानंतर मागण्याचे निवेदन शिक्षण आयुक्त पुणे यांना देण्यात आले .निवेदनाच्या प्रती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ग्रामविकास मंत्री शालेय शिक्षण मंत्री प्रधान सचिव ग्रामविकास विभाग व प्रधान सचिव शालेय शिक्षण विभाग यांना मेल द्वारे पाठवल्या . तसेच प्राथमिक शिक्षक बदली प्रक्रिया समितीचे अध्यक्ष तथा पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांना निवेदनाची प्रत देण्यात आली .यावेळी राज्य अध्यक्ष गौतम कांबळे, राज्य कोषाध्यक्ष दादासाहेब डाळिंबे ,राज्य कार्याध्यक्ष चंद्रकांत सलवदे ,राज्य महासचिव विठ्ठल सावंत , पुणे जिल्हाध्यक्ष विनोद चव्हाण दौंड कार्याध्यक्ष रवींद्र अहिवळे ,पुणे मनपा शाखा कैलास थोरात , हवेली तालुका अध्यक्ष राहुल गायकवाड ,इंदापूर तालुका अध्यक्ष सुहास मोरे,मिलिंद देटगे ,बारामती तालुका अध्यक्ष विनोद कुमार भिसे ,भोर तालुका अध्यक्ष अमोल लोंढे ,हवेली तालुका अध्यक्ष बाळासाहेब खरात ,महासचिव बाळासाहेब लोंढे ,विजय काळे ,अनिल सरोदे ,अनुश्री चव्हाण ,विजय वाघमारे ,सोमनाथ गजरे ,पुरंदर तालुका अध्यक्ष संजीव महापुरे , सरोदे ,श्याम बेंद्रे , तैमूरभाई शेख , राजूभाई आत्तार ‘धनंजय टेंबरे ,पांडुरंग घावटे ,लहू शितोळे ,सोमनाथ गजरे ,बापू विद्यागज ,दादा ना सूने भंडारी साधना भंडारी ,अंजली शिंदे ,मानसी थोरात ,वर्षाताई थोरात ,कविता केदार ,वैशाली गजरे,संध्या हारोळे ,पौर्णिमा रणपिसे ,विलास थोरात ,राहुल बनसोडे ,संतोष थोपटे ,शिवाजी गरड,जालिंदर भोसले ,विकास वायाळ ,उमाजी चव्हाण , सचिन भोंग ,पुरंदर तालुकाध्यक्ष रवींद्र गावडे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते .