महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे कार्य समाज उपयोगी – सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित जाधव

Read Time4 Minute, 15 Second

भाटनिमगाव गावातील गरीब कुटुंबांना पत्रकार संघाच्या वतीने जीवनोपयोगी वस्तूचे वाटप

इंदापूर (प्रतिनिधी):-  इंदापूर तालुक्यात जी गरीब कुटुंब आहेत.या कुटुंबांना संकटाच्या काळात मदत करण्यासाठी जीवन उपयोगी वस्तू व धान्याचे वाटप महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या माध्यमातून सुरू आहे.गरिबाच्या भुकेची जाणीव पत्रकारांना असल्यामुळे  समाज उपयोगी काम करणारा हा पत्रकार संघ आहे असे गौरवोद्गार बावडा येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित जाधव यांनी काढले.

                    महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ इंदापूर तालुका व शहर ग्रामीण मराठी पत्रकार संघ इंदापूर तालुका यांच्या वतीने गरीब,गरजू व शेतमजूर कुटुंबियांना मोफत अन्नधान्याचे व वस्तूंचे किटचे वाटप तालुकाअध्यक्ष नीलकंठ मोहिते,सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित जाधव,संघाचे जेष्ठ मार्गदर्शक मधुकर गलांडे, माजी सरपंच पंजाबराव गायकवाड,सरपंच अजित खबाले,ग्रामपंचायत सदस्य श्रीमंत खबाले,शरद गवळी,आकाश गायकवाड,माजी तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष महादेव खबाले,पोलीस पाटील स्वप्नील शिंदे  यांच्या हस्ते इंदापूर तालुक्यातील भाटनिमगाव येथे (शुक्रवार ता.२४ एप्रिल)रोजी वाटप करण्यात आले. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित जाधव बोलत होते.

            यावेळी पत्रकार संघाचे मुख्य सचिव सागर शिंदे, उपाध्यक्ष संदीप सुतार,पुणे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सोमनाथ ढोले,सदस्य निखिल कणसे,विजयराव शिंदे, दत्तात्रय गवळी,प्रेस फोटोग्राफर राजेंद्र भोसले,अक्षय आरडे,स्वप्नील चव्हाण व  पत्रकार संघाचे सर्व सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.पुढे बोलताना सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित जाधव म्हणाले की,ज्यांना गरीब कुटुंबाचे तहान-भूक कळली आहे.त्यांनाच मानवी जीवनात खऱ्या अर्थाने आनंद घेता व आनंद देता येतो, त्यामुळे संकटाच्या काळात मदत करण्याचे कर्तव्य इंदापूर तालुक्यातील पत्रकार संघाने बजावले आहे,या बजावलेल्या कर्तव्याचा इतिहास होणार आहे असेही कौतुक सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित जाधव यांनी केले.

        महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे मुख्य सचिव सागर शिंदे तालुका उपाध्यक्ष संदीप सुतार तसेच जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सोमनाथ ढोले,भाटनिमगाव गावचे पोलीस पाटील स्वप्नील शिंदे यांनी करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपस्थित कुटुंबांना मार्गदर्शन केले.

इंदापूर तालुक्यातील भाटनिमगाव येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने जीवनावश्यक वस्तू व धान्याचे वाटप करताना सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित जाधव व मान्यवर.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.

Previous post तितुर नदीचे पूर्व व पश्चिम बाजूचे नदीपात्राजवळील 05 गावठी हातभट्टी दारूच्या भट्ट्यावर धडक कारवाई मुद्देमाल जागीच नष्ट
Next post कुरकुंभ मोरी दौंड पोलिस प्रशासनाने काही महिन्यांपूर्वी बंद केली तरी गुपचूप मोटार सायकल वापर चालू
error: Content is protected !!
%d bloggers like this: