संपादक गफ्फार शेख(मलिक)
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
पाचोरा(प्रतिनिधी)- दिनांक 1 जुलै रोजी पाचोरा येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची बैठक संपन्न झाली यावेळी नूतन ग्रामीण कार्यकरनी जाहीर करण्यात आली यावेळी नवीन सदस्यांना नियुक्ती पत्र देत सत्कार करून शुभेछा देण्यात आल्या.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, प्रदेशाध्यक्ष मा. वसंतराव मुंडे, राज्य संघटक मा. संजय भोकरे, राज्य महासचिव मा. डॉ. विश्वास राव आरोटे, राज्य कार्याध्यक्ष प्रवीण सपकाळे खान्देश विभागीय अध्यक्ष किशोर रायसाकडा यांच्या मान्यतेने ही निवड करण्यात आली असून
पाचोरा तालुकाध्यक्ष इलेक्ट्रॉनिक मीडिया विंग या पदावर पत्रकार गजानन लादे यांची निवड करण्यात आली या वेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे ज्येष्ठ सल्लागार मा. नितीन भाऊ पाटील, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे खानदेश विभागीय अध्यक्ष किशोर भाऊ रायसाकडा, खानदेश विभागीय उपाध्यक्ष भुवनेश दुसाने, खानदेश विभागीय संपर्कप्रमुख राकेश भाऊ सुतार, जनशक्ती तालुका प्रतिनिधी विजुभाऊ पाटील, तसेच महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई पाचोरा शहराध्यक्ष राजेंद्र खैरनार, यांच्या सर्वांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकारी श्री गजानन लाधे यांना नियुक्ती पत्र देत सत्कार करत निवड झाली पत्रकार व सामाजिक हिताच्या कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.