अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
मुक्काम पोस्ट चाळीसगाव
जशी जशी निवडणुक जवळ येऊ लागली तसे तसे निवडणुकीचे वारे जाहिरातींच्या माध्यमातून जोर धरत आहे.अशाच एक युट्यूब वरील जाहिरात मध्ये मागच्या कार्यकाळातील छत्रपती शिवरायांचे शिवस्मारक आपण दाखवत आहात,खरोखर आनंद होतो की ते कार्य आपल्या कार्यकाळात झाले शिवभक्तांची मनातील इच्छा पूर्ण झाली.पण त्या जाहिरातीत आपण गणित नगरीचे मंजुरीचे जे गणित मांडले आहे. ते गणित सोडविण्यासाठी आपण शून्य प्रयत्न केल्याने ते स्वप्न अपूर्ण राहिल्याने आपल्या कार्यकाळात आश्वासनाची भर पडून विकास कामात वजाबाकी झाली आहे.हे पण विसरून चालणार नाही.आपल्या कार्यकाळात केलेल्या विकास कामांची बेरीज करण्यासाठी जाहिरातीत गणित नगरी मंजुरीची जोडणी करण्याचा आपला प्रयत्न म्हणजे स्वप्न असलेली गणितनगरी पूर्ण केली असल्याचा भास निर्माण करून स्वतःला सिद्ध करण्याची जुळवाजुळवी समजावी लागेल का? असो ते के के मुस कलादालन पण पूर्ण झाले आहे असे कला प्रेमींना वाटत नाही.पण आपल्याला वाटते बर आहे.त्यात आपण आवर्जून उल्लेख केला की पर्यटकांची संख्या वाढली पण ते पर्यटक कधी येता कधी जाता कळतच नाही.तशी जाहिरात मस्त झाली आहे.असेच शहराच्या विकासात मस्त काम झाले असते तर आजचे चित्र वेगळे असते, पण राजकारणात दादांनी गप्पा करायच्या त्यांच्या गप्पांच्या गोष्टी कार्यकर्त्यांनी जनतेला सांगायच्या आणि जनतेनी मिळालेली आश्वासने घेऊन पाच वर्ष मोठी मोठी स्वप्न पहायची आणि पाच वर्षांनंतर पुन्हा मागच्या गप्पा,गोष्टी आणि आश्वासनांचा प्रचार ऐकून पुन्हा राजकीय स्वप्नात जनतेने मग्न व्हायचे असे सुरू राहू द्यायचे की पुढे काय करणार असा सवाल दादांपुढे उपस्थित करायचा याचा विचार सुज्ञ नागरिक करतील की स्वप्न भंग होण्याची वाट पाहत बसणार आज विचारू शकता नाहीतर पाच वर्ष फक्त ऐकावे लागेल…..