मागासवर्गीय शिक्षकांच्या फाईलवर सही करण्यासाठी शिक्षणाधिकारी यांना वेळ नाही-महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे राज्याध्यक्ष गौतम कांबळे

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी विजय जाधव
पुणे(प्रतिनिधी)-पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी श्रीमती सुनंदा वाखारे यांना मागासवर्गीय शिक्षकांच्या फाईलवर सही करण्यासाठी अद्याप वेळ मिळेनासा झाला आहे असा आरोप महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे राज्याध्यक्ष गौतम कांबळे यांनी केला आहे .याविषयी आमच्या प्रतिनिधी सविस्तरपणे बोलताना गौतम कांबळे म्हणाले की ,सत्यदेव गजानन खाडे यांच्या सेवानिवृत्ती व उत्तम लहू जावळे यांच्या सेवाजेष्ठता यादी तयार करणे या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी श्रीमती संध्या वाखारे यांना अजिबात वेळ मिळत नाही .त्यामुळे श्री सत्यदेव खाडे यांचा सेवानिवृत्ती वेतनाचा प्रस्ताव रेंगाळला आहे तर उत्तम जावळे यांचा मुख्याध्यापक पदोन्नतीचा प्रश्न रेंगाळला आहे . श सत्यदेव गजानन खाडे हे 31 मे 2023 रोजी सेवानिवृत्त झालेले आहेत .सेवानिवृत्ती वेतनासंदर्भातील त्यांचा प्रस्ताव दिनांक-19 डिसेंबर 2022 रोजी देवून सुमारे सहा महिने होऊन गेले व दिं -23 मे 2023 पर्यंत AG ऑफीसला पाठवण्यास विलंब लावला . 20 जून 2023 रोजी AG ऑफीसचे आक्षेप पत्र येवून अजूनपर्यंत सुमारे
दोन महिन्यापेक्षा अधिक काळ माध्यमिक शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद पुणे यांच्याकडे फक्त सही होण्यासाठी पडून आहे .या शिक्षकांची जाणीवपूर्वक अडवणूक केली जात आहे अशी तक्रार त्यांनी संघटनेकडे दिलेली आहे .
तसेच पिंपळगाव तालुका दौंड जिल्हा पुणे येथील सेवा जेष्ठ शिक्षक श्री उत्तम लहू जावळे हे सेवाजेष्ठ आहेत परंतु मागासवर्गीय असल्यामुळे त्यांना मुख्याध्यापक पदाचा पदभार दिला जात नाही व सेवा जेष्ठता यादी अंतिम करण्याच्या बाबतीत एक वर्षापेक्षा अधिक काळ चालढकल केली जात आहे .सहा शिक्षकांची सेवा जेष्ठता यादी तयार करण्यासाठी एक वर्षाचा कालावधी लागतोच कसा हा एक गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे .शासकीय कामकाज कोणत्या विचारधारेने चालते आहे याचा वरिष्ठांनी आढावा घ्यावा .श्रीमती सुनंदा वाखारे शिक्षणाधिकारी माध्यमिक यांना वर्षभरापासून ६ शिक्षकांची ज्येष्ठता यादी करण्यास वेळ मिळत नाही ही खेदजनक बाब आहे .त्यांच्या मनात असलेल्या जातीय अकसातून या दोन्ही मागासवर्गीय शिक्षकांवर अन्याय करत आहेत असे प्रथमदर्शनी दिसून येत आहे .या दोन्ही शिक्षकांवर होणारे सेवानिवृत्ती उपदान आर्थिक लाभापासून व पदोन्नतीचे आर्थिक लाभ यापासून त्यांना वंचित ठेवले जात आहे. या शिक्षकांवर होणाऱ्या अन्यायाला पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी श्रीमती सुनंदा वाखारे जबाबदार असल्याची तक्रार या शिक्षकांनी संघटनेकडे केलेली आहे .माध्यमिक शिक्षणाधिकारी श्रीमती सुनंदा वाखारे यांना या प्रश्नसंदर्भात भेटलो असता प्रश्न सोडवले जातील या आश्वासनाशिवाय काहीही पदरात पडत नाही .या सर्व प्रकाराची जबाबदारी माध्यमिक शिक्षणाधिकारी श्रीमती सुनंदा वाखारे यांच्यावर निश्चित करून खातेनिहाय चौकशी करण्यासंदर्भात शासनाकडे प्रस्ताव सादर करावा अशी विनंती पुणे विभागाचे शिक्षण उपसंचालक राजेंद्र अहिरे यांना केली आहे .या निवेदनाच्या प्रती माध्यमिक विभागाचे शिक्षण संचालक तसेच पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पाठवण्यात आलेल्या आहेत .