माय रमाई फाउंडेशन ट्रस्ट,महाराष्ट्र राज्य,सोलापूर जिल्ह्यात शाखा, उदघाटन कार्यक्रम.प्रमुख उपस्थिती आणि उद्घाटक,डॉ.अमर चौरे- संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
उपसंपादक रोहित शिंदे
जलोळी,ता-पंढरपुर(विशेष प्रतिनिधी)-जलोळी या गावात माय रमाई फाऊंडेशन ट्रस्ट-महाराष्ट्र राज्य,जलोळी शाखेचे उद्घाटन डाॅ.अमर चौरे यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरूवात छत्रपती शिवाजी महाराज आणि महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर,यांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आले.तसेच माता जिजाऊ आणि माता रमाई याचे पूजन राणी ओहोळ आणि योगिता रसाळ यांनी केले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुनिता नवगिरे यांना करण्यात आले.यावेळी राणी ओहोळ-उपाध्यक्ष पुणे जिल्हा,योगिता रसाळ- युवती अध्यक्ष दौंड तालुका,श्रीकांत गायकवाड-युवक अध्यक्ष दौंड शहर पुंडलिक किर्ते-अध्यक्ष सोलापूर जिल्हा.इ उपस्थित होते.कार्यक्रमाचे संयोजन सविता नवगिरे आणि आशा नवगिरे यांनी केले.
यावेळी आशा नवगिरे यांची पंढरपुर तालुका अध्यक्ष पदी,सुनिता हावळे यांची पुणे शहर अध्यक्ष पदी,श्रीकांत गायकवाड यांची दौंड शहर युवक अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.या सर्वाचे सविता नवगिरे यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
यावेळी जलोळी गावचे सरपंच बिपीन नरसाळे,कविता जाधव राष्ट्रवादी कार्याध्यक्ष सोलापूर जिल्हा, काका नरसाळे व इतर मान्यवर उपस्थित होते.यावेळी सविता नवगिरे आणि कविता जाधव यांचा विशेषi सत्कार करण्यात आला.कार्यक्रमास मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्रीकांत गायकवाड यांनी करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.