अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
दौंड शहर प्रतिनिधी पवन साळवे
छत्रपती शिवाजी महाराज,डॉ.बाबासाहेब आंबेडकर,महात्मा फुले, अशा महापुरुषांच्या महाराष्ट्रा मधे मानुसकिला काळीमा फासणाऱ्या घटना वारंवार घडत आहेत. ज्या महापुर्षानी कधीही जाती मानल्या नाही त्याच महापुरुषांच्या जन्म आणि कर्मभूमित आज जातीय द्वेषातुंन एक नव्हे तर एका पाठोपाठ एक हत्याकांड व अत्याचार वाढंतच आहेत आणि यात दलित समाजतिल युवक जे उद्याचे देशाचे भवितव्य आहेत अशा दलित युवकांची जातीय द्वेषातुंन हत्या होत आहेत अत्याचार होत आहेत. नागपुर तालुका नारखेड़ येथील उच्चशिक्षित युवक अरविंद बनसोड या युवकाची हत्या होते आणि गुन्हेगार स्वताला वाचविण्यासाठी मृत युवक (अरविंद बनसोड) च्या मुखात विष ओतुन ती हत्या नसून आत्महत्या आहे अस दाखवून राजकीय पाठिंबा घेऊन प्रकरण दाबन्याचा प्रयत्न केला जात आहे. आणि त्या ठिकान वरील पोलीस प्रशासना कढुनही सदरील घटना ही कलम 302 नसून फ़क़्त किरकोळ मारहाण व आत्महत्या आहे असा नमूद करण्यात आले आहे.
दूसरी घटना पुणे,पिम्परी-चिंचवड़,पिम्पळे सौदागर येथील आहे. विराज जगताप वय वर्ष 20 या युवकाची अंतर जातीय प्रेमप्रकरनातून जातीय द्वेषामुळे हत्या करण्यात अली
तीसरे व चौथे प्रकरण साळापूरी गांव जिल्हा परभणी व जळगांव जिल्ह्यातील आहे ज्याना जातीय द्वेषातुन जिव मारण्याचा प्रयत्नातुन मारहाण करण्यात अली अशे अनेक घटना वारंवार घडत आहेत व अशा जातीयवादयांना कायद्याचा धाक राहिला नाही का…?? असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे सदारील आरोपिंना ताबड़तोब अटक करून CBI मार्फ़त चौकशी करावी व हत्या करणाऱ्या आरोपींना कलम 302 व sc,st कायदा अंतर्गत Atrocity act दाखल करावी व कठोराहुन कठोर शिक्षा करावी अन्यथा सामान्य जंनतेचा कायदा व प्रशासनावरुंन विश्वास उठेल.
अशी मागणी वंचीत बहुजन अघाड़ी दौंड शहर व तालुकाच्या वतीने निवेदना द्वारे करण्यात अली आहे. निवेदन देंताना
दौंड तालुका अध्यक्ष आश्विन भाऊ वाघमारे
दौंड शहर अध्यक्ष अनिकेत भाऊ मिसाळ
दौंड शहर सचिव अक्षय शिखरे
मयूर जाधव तालुका प्रसिद्धि प्रमुख
नागेश आरवड़े,अलेगाव
व अन्य कार्यकर्ते उपस्तित होते.