अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी विजय जाधव
पुणे(प्रतिनिधी)-आंतरराष्ट्रीय योग दिन 2016 पासून 21 जून रोजी साजरा करण्यात येत आहे .हा योगदिन साजरा करण्यावरून पुणे जिल्हा परिषदेचे अधिकारी गोंधळलेले दिसून आले .त्यांच्यामध्ये आपसात कोणताही समन्वय नसल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले .पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी योगदिनासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्यालयातील कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना सकाळी ८ ते ९ या वेळेत हजर राहण्याबाबत सूचना निर्गमित केली .तर जुन्नर व दौंड पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांनी योग दिनानिमित्त सकाळी ७ ते दुपारी १२:३० अशी शाळा भरवावी याबाबतच्या सूचना निर्गमित केल्या .तर जिल्ह्याचे प्रभारी शिक्षणाधिकारी कमलाकांत म्हेत्रे शाळेत सकाळी ९ वाजता योग दिन साजरा करून शाळा सकाळी १० ते दुपारी ५ वेळेत भरवण्यावर ठाम होते .प्रत्येक अधिकाऱ्याच्या वेगवेगळ्या भूमिकेमुळे एका संघटनेच्या पदाधिकार्याने शिक्षण आयुक्त सुरज मांढरे व विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याशी संपर्क साधून जिल्ह्यात योगदिनासाठी सकाळची एकच वेळ असावी अशी मागणी केली .त्यानंतर
वरिष्ठांच्या सूचना मिळाल्यावर प्रभारी जिल्हा शिक्षणाधिकारी कमलाकांत म्हेत्रे यांनी घाईगडबडीने योगदिनाचे पत्र काढले .तोपर्यंत उशीर झाला होता .जिल्ह्यातील शाळा सुटल्या होत्या .शाळा सुटल्यानंतर जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांचे पत्र व्हाट्सअपद्वारे पाठवण्यात आले .पुन्हा विद्यार्थ्यांना योगदिनाची वेळ कळवण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षकांची मात्र तारांबळ उडाली .अधिकाऱ्यांमध्ये समन्वय नसल्याचा त्रास अनेकदा प्राथमिक शिक्षकांना सहन करावा लागत आहे .यावरून जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांमध्ये आपसात समन्वय नसल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे .
जागतिक योग दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खोरवडी येथील शाळेत योग दिन साजरा करण्यात आला .यावेळी शिक्षक व अनेक विद्यार्थ्यांनी सुंदर अशी योगासने करून दाखवली .योग दिनाचा कार्यक्रम साधारणतः दोन तास चालला .सर्व विद्यार्थ्यांनी या उपक्रमात आनंदाने सहभाग घेतला .शाळेतील सहशिक्षक अभिजीत कोंडेजकर यांनी योगासनाचे महत्त्व सांगितले .विद्यार्थ्यांकडून नियमित योगासने करून घेण्याचा शाळेतील सर्व शिक्षकांनी म्हणजे व्यक्त केला .शाळेतील शिक्षिका नीता भद्रे ,साक्षी कोंडेजकर ,शितल कदम ,कुंदन सकट या शिक्षिकांनी योगासने करून दाखवली .यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शितल सोनवणे ,उपाध्यक्ष बाबासाहेब सकट ,शाळेचे मुख्याध्यापक गौतम कांबळे ,प्रशांत सकट ,अतुल सोनवणे ,गायत्री शिपकुले इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते .