संपादक गफ्फार शेख(मलिक)
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
चाळीसगाव(प्रतिनिधी) – स्वराज्य नेस्तनाबूत करण्यासाठी चालून येणाऱ्या औरंगजेबाशी छत्रपती संभाजी महाराजांनी अखेरपर्यंत लढा देत स्वराज्याची धुरा सक्षमपणे सांभाळली लोककल्याणकारी योजनांद्वारे प्रजेचे हित जपले. अनेक भाषांवर प्रभुत्व असणारे बुद्धी आणि शौर्याचा अद्भूत संगम असणारे स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने दि १४ मे २०२४ रोजी पवार वाडी स्थित विठ्ठल रुख्मिनी मंदिर सभागृहात छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन रयत सेनेच्या वतीने करण्यात आले. यावेळी छत्रपती संभाजी महाराजांच्या जयजयकाराने परिसर दणाणून गेला,
एका हाताने तलवार चालवित पराक्रमाने मर्दुमकी गाजवणारे तर दुसऱ्या हाताने लेखणी चालवत अल्पवयात नायिकाभेद, सातसतक, बुधभूषण सारख्या ग्रंथांचे लेखन करणारे, परकीयांना सळो की पळो करून सोडणारे स्वराज्याचे धाकले धनी, प्रकांड पंडित, महान वीर, रौद्र छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त दि १४ मे २०२४ रोजी पवार वाडी स्थित विठ्ठल रुख्मिनी मंदिर सभागृहात छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण रा. वि. चे शिक्षक आर बी जगताप यांनी केले तर छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन सकल मराठा समाजाचे मार्गदर्शक राजेंद्र पाटील यांनी केले,कार्यक्रमास रयत सेना संस्थापक अध्यक्ष गणेश पवार,प्रदेश समनव्यक पी एन पाटील,जिल्हा उपाध्यक्ष स्वप्नील गायकवाड,तालुका उपाध्यक्ष मुकुंद पवार, शहर अध्यक्ष छोटु अहिरे,शहर कार्याध्यक्ष प्रदीप मराठे,शहर संघटक दिपक देशमुख,शहर उपाध्यक्ष सतीश पवार,सुनील पवार, प्रकाश पवार,पप्पू घुले तर शाहू मराठा मासिकाचे संपादक प्रशांत गायकवाड उपस्थित होते,