राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत खान्देश विभागातून अमळनेरकर सारांश सोनार प्रथम!

0 0
Read Time3 Minute, 16 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

अमळनेर(वृत्तसेवा)-महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आयोजित राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत धुळे विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी सारांश सोनार यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
‘बहुआयामी लोकराजा राजर्षी शाहू महाराज’ या विषयावर सारांश सोनार यांनी प्रभावी विचार पेरणी केली. ते पुढील अंतिम फेरीसाठी निश्चित झाले आहेत.

अनिस च्या वतीने छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्ताने राज्यस्तरीय खुल्या वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आल्यात. खान्देश विभागात धुळे, जळगाव,नंदुरबार, नाशिक व अहमदनगर या जिल्ह्यातील ४४ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. प्रथम खान्देश विभागीय स्तरावर गेल्या दोन दिवसांपासून या स्पर्धेचे आयोजन आॅनलाईन पद्धतीने गुगल मिट वर झाले.

सारांश सोनार (अमळनेर) प्रथम, प्रफुल्ल तोताराम माळी (धुळे) द्वितीय, विश्वजीत शिंदे (नंदुरबार) यांनी तृतीय क्रमांक पटकावला असून त्यांची दिनांक २५ जून रोजी होणाऱ्या अंतिम स्पर्धेसाठी निवड झाली. या स्पर्धेत तेजल सोनवणे, (तळोदा,) चतुर्थ, सतीश खंडू शिंदे पिंप्री-जळगाव पाचवा तर सारखेच गुण असल्याने अमळनेर येथील जयेश संजय सोनार, अहमदनगर येथील नेहा जोशी व चोपडा जिल्हा जळगाव येथील प्रियंका पाटील यांना विभागून सहाव्या क्रमांकाचे बक्षीस देण्यात आले.
विजेत्यांना रोख रक्कम प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रा.आशा लांडगे, (नाशिक) प्रा.जयश्री चव्हाण,(,नवापूर,) प्रा.बी.एम.भामरे (धुळे) व प्रा.सोपान बोराटे (भुसावळ) यांनी काम पाहिले. सूत्रसंचालन व स्वागत नंदुरबार येथील प्रा.बलदेव वसईकर, प्रास्ताविक डॉ.दीपक बाविस्कर (धुळे), परिक्षकांचा परिचय जळगाव येथील कल्पना चौधरी यांनी तर नियमावली वाचन नाशिक येथील प्रा.सुशीलकुमार इंदवे यांनी व नगरचे अशोक गवांदे यांनी केले.
स्पर्धेचे तंत्र साहाय्यक म्हणून अंनिसचे राज्य सरचिटणीस विनायक सावळे यांनी तर अंनिसचे जिल्हा कार्याध्यक्ष दिगंबर कट्यारे यांनी आभार मानलेत.

Happy
Happy
100 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.