Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

राज्यात डिजिटल शिक्षणासाठी शिक्षकांना ऑनलाइन गुगल क्लासरूम प्रशिक्षण शासनाचा उपक्रम

0
1 0
Read Time6 Minute, 24 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

उपसंपादक रोहित शिंदे

जळगाव- दिनांक 22 महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडविण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री नामदार उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री नामदार अजित पवार, तसेच सर्व मंत्रिमंडळ तसेच राज्याच्या शालेय शिक्षण विभाग,शालेय शिक्षण मंत्री माननीय नामदार वर्षाताई गायकवाड यांच्या प्रेरणेने आणि पुढाकारातून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे विविध मार्गाचा अवलंब करीत आहे.शाळा बंद पण शिक्षण सुरू अशा परिस्थितीत शाळा बंद परिस्थितीत ऑनलाईन पद्धतीला महत्त्व प्राप्त झाले आहे.महाराष्ट्र सरकार गुगल फॉर एज्युकेशन स्कूल नेट फॉर इंडिया, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे द्वारा राज्यातील शिक्षकांना ऑनलाइन डिजिटल टूल्स फॉर एज्युकेशन एज्युकेशन च्या बाबतीत गूगल क्लासरूम द्वारा गूगल द्वारा समृद्ध करण्याचा कार्यक्रम शासनाच्या पुढाकाराने हाती घेण्यात आला असून पहिल्या टप्प्यातील ऑनलाइन प्रशिक्षणाची दोन दिवशीय कार्यक्रमाची पहिल्या टप्प्याची दिनांक २२ रोजी सांगता झाली. सदरील ऑनलाइन राज्यस्तरीय प्रशिक्षण शिक्षकांना देण्यात येत असून लगेच यशस्वीरित्या प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या शिक्षकांना ऑनलाईन सर्टिफिकेट उपलब्ध होत आहे.नोंदणीकृत महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन परिषद पुणे द्वारा प्राप्त यादी आणि प्राप्त पासकोड झालेल्या शिक्षकांना डिजिटल एज्युकेशन संदर्भात कल्पेश महाशिलकर आणि मनीष किरडे यांनी दिनांक २१आणि २२ सप्टेंबर २०२० रोजी सखोल मार्गदर्शन केल्याची माहिती या प्रशिक्षणात सहभागी झालेल्या जळगाव जिल्ह्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा गालापूर येथील प्रयोगशील शिक्षिका तसेच शासनाच्या तेजस प्रकल्पातील टॅग कॉर्डिनेटर तथा एरंडोल तालुका MOOC प्रकल्पाच्या तालुका कॉर्डिनेटर जयश्री पुरुषोत्तम पाटील यांनी दिली. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की,कालसुसंगत व शिक्षकांना अपडेट राहण्यासंदर्भात महाराष्ट्र राज्यशासनाने तसेच राज्य शालेय शिक्षण विभागाने उचललेले हे महत्त्वपूर्ण आणि आम्हा शिक्षकांना उपयुक्त पाऊल आहे. सदरील प्रशिक्षण यशस्वी रित्या पूर्ण करताना खूप गोष्टी शिकायला मिळाल्याअसल्याचे म्हटले. सहभागी व यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थींना लगेच ऑनलाईन राज्य सरकार द्वारा प्रमाणपत्र देखील ईमेलवर प्राप्त झालेत. दरम्यान या गूगल क्लासरूम राज्यस्तरीय प्रशिक्षणाच्या संदर्भात शिक्षकांसाठी नियोजन करून कठीण काळात अपडेट होण्याची सुवर्ण संधी मिळवून दिल्याचे महाराष्ट्र राज्यातील 32 शिक्षक संघटनांच्या एकत्रित येऊन स्थापन केलेल्या महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटना समितीचे राज्य महासचिव तथा महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाचे राज्य महासचिव आणि या प्रशिक्षणात सहभाग घेऊन यशस्वीरित्या प्रशिक्षण पूर्ण करणारे राज्य शासन आदर्श शिक्षक पुरस्काराचे मानकरी किशोर पाटील कुं झरकर यांनी राज्य शासनाचे तसेच मुख्यमंत्री नामदार उद्धव ठाकरे शालेय शिक्षण मंत्री नामदार वर्षाताई गायकवाड उपमुख्यमंत्री नामदार अजित पवार तसेच एस सी ईआर टी चेआभार व्यक्त केले असून शाळा बंद परंतु शिक्षण सुरू अशा अवस्थेत ऑनलाइन पद्धतीने राज्यातील शिक्षकांना शिकण्याची ही सुवर्णसंधी असल्याचे म्हटले.यासंदर्भात त्यांनी राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री नामदार वर्षाताई गायकवाड तसेच एस सी आर ई आर टी चे संचालक डॉक्टर दिनकर पाटील, आयटी सेल, स्कूल नेट फॉर इंडिया टीम आणि अंमलबजावणी करणाऱ्या सर्व घटकांचे शिक्षक संवर्ग कडून व शिक्षण संघटनांकडून अभिनंदन केले आहे. प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी डायट चे प्राचार्य व सर्व टीम त्याच जोडीने गटशिक्षणाधिकारी , शिक्षण विस्ताराधिकारी विशेष तज्ञ आयटी सेलकेंद्रप्रमुख या प्रशिक्षणाच्या यशस्वीतेसाठी समन्वयाची भूमिका बजावत आहेत.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: