राज्य शासनाच्या शिक्षणसेवकांच्या मानधनात वाढ करण्याच्या व कै . सागर देशमुख यांच्या वारसांना एक लाख रुपये मदतनिधी देण्याच्या पुणे जिल्हा परिषदेच्या निर्णयाचे स्वागत-गौतम कांबळे ,राज्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघ

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी विजय जाधव
दौंड(प्रतिनिधी)-महाराष्ट्र शासनाने शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेतला व पुणे जिल्हा परिषदेने कै . सागर देशमुख यांच्या कुटुंबीयांना एक लाख रुपयाचा मदत निधी दिला या दोन्ही निर्णयाचे महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे राज्याध्यक्ष गौतम कांबळे यांनी स्वागत केले आहे .याविषयी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना गौतम कांबळे म्हणाले की,गेली दोन वर्षे महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाच्यावतीने निवेदन देऊन मागणी करण्यात येत होती की , सध्या महागाई काळात सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगानुसार वेतन मिळत आहे .त्याचप्रमाणे राज्य सरकारने प्राथमिक विभागातील शिक्षण सेवकांना रू .१६ हजार,माध्यमिक शिक्षण सेवकांना रु . १८हजार व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षण सेवकांना रु . २०हजार प्रमाणे मानधन वाढ केली आहे .या शासन निर्णयाचे स्वागत महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाचेवतीने करण्यात आले आहे.
ग्रामपंचायत निवडणूक कर्तव्यावर असताना धानेप ता.वेल्हे येथे कै .सागर देशमुख यांचे अपघाती निधन झाले . त्यांच्या वारसांना जिल्हा परिषद पुणे यांचे वतीने एक लाख रुपये मदतनिधी देण्यात आला . याबद्दल पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद व शिक्षण विभागातील सहाय्यक प्रशासन अधिकारी शेखर गायकवाड यांचे महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाच्यावतीने आभार व्यक्त करण्यात आले.